प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध इंडस्ट्रीज त्यांच्या उत्पादनांवर आणि सेवांवर ग्राहकांसाठी विविध ऑफर्स जाहीर करतात आणि तेच दूरसंचार कंपनी Vi (पूर्वी व्होडाफोन आयडिया) ने केले आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे. ज्याद्वारे वापरकर्ते जेव्हा Vi ऍपद्वारे रिचार्ज करतात तेव्हा त्यांना 5GB पर्यंत अतिरिक्त हाय-स्पीड डेटा मिळेल.
हे सुद्धा वाचा : Coca-Cola घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन, तुम्ही पण बघा अनोखी डिझाईन
Vi ने एका प्रेस रिलीजद्वारे माहिती दिली आहे की, कंपनी आपल्या ग्राहकांना काही रिचार्जवर अतिरिक्त डेटा देत आहे. यासाठी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत Vi ऍपद्वारे त्यांचा Vi नंबर रिचार्ज करावा लागेल. ऍपवर 299 रुपये आणि त्याहून अधिकच्या रिचार्जवर वापरकर्त्यांना 5GB अतिरिक्त डेटा मिळेल. तर, जे ग्राहक रु. 199 आणि त्यावरील प्लॅन निवडतात त्यांना देखील फायदा होईल. कारण Vi त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 2GB अतिरिक्त हाय-स्पीड डेटा देत आहे.
येथे एक अट देखील आहे की, रिचार्जद्वारे विनामूल्य मिळालेला अतिरिक्त डेटा एका महिन्याच्या आत वापरावा लागेल, त्यानंतर डेटा कालबाह्य होईल. वापरकर्त्यांना रिचार्ज केल्यानंतर 28 दिवसांच्या आत हा अतिरिक्त डेटा वापरावा लागेल. ही ऑफर सर्व Vi ग्राहकांसाठी 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध आहे.
Vi च्या 299 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटासह 28 दिवसांसाठी "ट्रू" अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. तर, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह 18 दिवसांसाठी 1GB दैनिक डेटा दिला जातो. दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 100 SMS चा लाभ देखील उपलब्ध आहे.