देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी Vodafone-Idea (VI) बंद होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कंपनी कर्जात असल्यामुळे VI बद्दल अनेक प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. पण, जेव्हा व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅन गायब झाले, तेव्हा बातम्यांना अधिक बळ मिळाले. अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडिया कंपनी बंद झाल्याचे सर्वत्र पसरली. या संदर्भात व्होडाफोन-आयडियाकडून निवेदन आले आहे, ते बघुयात…
हे सुद्धा वाचा : BSNL ची वापरकर्त्यांसाठी अप्रतिम ऑफर ! सर्व 9 OTT ऍप फक्त 249 रुपयांमध्ये उपलब्ध
व्होडाफोन-आयडिया बंद झाल्याच्या बातम्यांदरम्यान, कंपनीकडून प्रतिक्रिया आली आहे. कंपनीने सांगितले की आम्हाला काही चुकीचे मीडिया रिपोर्ट मिळाले आहेत, ज्यात दावा केला आहे की Vi प्रीपेड रिचार्ज सेवा काही तासांसाठी उपलब्ध होणार नाही.
आम्ही आमच्या ग्राहकांना सूचित करू इच्छितो की, अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ते म्हणाले की, Vi ने फक्त दिल्ली सर्कलमधील काही प्रीपेड वापरकर्त्यांना 22 जानेवारीच्या रात्री ते 23 जानेवारीच्या सकाळपर्यंत काही तासांसाठी सिस्टम अपग्रेडबद्दल SMS द्वारे माहिती दिली आहे, या कालावधीत रिचार्ज सेवेमध्ये काही विलंब होऊ शकतो.
कंपनीचे म्हणणे आहे की, रिचार्ज प्लॅन गायब झाल्याच्या बातम्या निराधार आहेत. खरं तर, सिस्टम अपग्रेडमुळे दिल्ली सर्कलमधील रिचार्ज प्लॅन्स काही तासांसाठी दिसणे बंद झाले होते. कंपनी बंद झाली नाही. व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही.