Vodafone Idea देशातील तिसरी मोठी टेलिकॉम दिग्गज आहे. सध्या VI युजर्स 5G नेटवर्कची प्रतीक्षा करत आहे. कंपनीने मंगळवारी आपल्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी ‘VI Priority’ सेवा सुरू केली आहे. नावाप्रमाणेच या सेवेअंतर्गत कंपनी निवडक ग्राहकांना काही सेवांमध्ये प्राधान्य देईल. VI Priority सर्व्हिस आधीपासूनच अस्तित्वात आहे, जी आता पोस्टपेड ग्राहकांसाठी लाईव्ह करण्यात आली आहे. त्याबरोबरच, ही सेवा VI च्या ज्येष्ठ नागरिक वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध असेल. स्पेशल सर्व्हिसबद्दल सर्व तपशील सविस्तर जाणून घेऊयात.
Vi प्रायोरिटी सेवेअंतर्गत, वापरकर्त्यांना तीन वेगवेगळ्या स्तरांवर व्यापकपणे प्राधान्य दिले जाते. ही सेवा सध्या फक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता, गुजरात, कर्नाटक, करेला, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये लाईव्ह आहे.
कस्टमर केयरसह कनेक्ट होण्यासाठी वापरकर्त्यांना IVR म्हणजेच इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्सद्वारे जावे लागणार नाही. युजर्स कस्टमर केयरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकतात.
Vi Store मध्ये देखील या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना प्राधान्य दिले जाते. तुम्ही दुकानात जाताच तुम्हाला तुमचे काम करण्यासाठी थांबण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुमचे काम लगेच करून देण्यात येईल.
तुम्हाला VI App वर बिल पेमेंट करण्याची सुविधा मिळते. पेमेंट करण्यासाठी युजर्सना एन्हान्स्ड युजर इंटरफेस मिळतो.
– Vodafone Idea ची ही 'VI Priority' सेवा 699 रुपये आणि त्यावरील पोस्टपेड प्लॅनच्या भाडेतत्वावर उपलब्ध असणार आहे.
– ही सेवा 4 किंवा अधिक कनेक्शन असलेल्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनवर देखील लागू आहे.
– गेल्या 10 वर्षांपासून VI नेटवर्कशी जोडलेले ज्येष्ठ नागरिक वापरकर्त्यांसाठी देखील ही सर्व्हिस उपलब्ध आहे.