VI ने आणला नवा प्लॅन, 90 दिवसांच्या वैधतेसह दररोज मिळेल 2GB डेटा
VI चा 903 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन संपूर्ण 3 महिन्यांच्या म्हणजेच 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.
Sony LIV चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध
VI सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आहे. आता Vodafone idea ने 90 दिवसांच्या वैधतेसह एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. कंपनीने वेबसाईटवर या प्लॅनला ट्रूली अनलिमिटेड कॅटेगरीमध्ये गुपचूपपणे लिस्ट केले आहे. यात तुम्हाला OTT बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता या प्लॅनची किमंत आणि इतर लाभ जाणून घेऊयात.
VI चा 903 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन संपूर्ण 3 महिन्यांच्या म्हणजेच 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 2GB डेटा दिला ऑफर केला जाईल. म्हणजेच, यात एकूण 180GB डेटा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, अमर्यादित मोफत कॉलिंगच्या सुविधेसह दररोज 100SMS दिले जातात. विशेष म्हणजे यात मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. Sony LIV चे मोफत सबस्क्रिप्शन यात 90 दिवसांसाठी मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत मोफत डेटा डिलाइटचा लाभ मिळेल. हे बेनिफिट क्लेम करण्यासाठी ग्राहकांना 121249 वर कॉल करावा लागेल किंवा VI App ला भेट द्यावी लागेल. तसेच, अतिरिक्त लाभ म्हणून युजर्सना Binge All Night, Weekend Data Rollover, Vi Movies आणि TV चा लाभ देखील मिळत आहे.
90 दिवसांसह येणारे इतर कंपन्यांचे प्लॅन्स
Jio च्या 899 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा मिळतो. तसेच, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS देखील मिळतात. तर, Airtel च्या 779 रुपयांचा प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, 1.5GB डेली डेटा, दररोज 100 SMS, Wynk Music सबस्क्रिप्शन, मोफत Hello Tunes, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक इ. सुविधा मिळणार आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile