digit zero1 awards

Vi ने लाँच केला 401 रुपयांचा नवीन प्लॅन, 1 वर्षासाठी मिळेल OTT चे HD सबस्क्रिप्शन

Vi ने लाँच केला 401 रुपयांचा नवीन प्लॅन, 1 वर्षासाठी मिळेल OTT चे HD सबस्क्रिप्शन
HIGHLIGHTS

Vi चा 401 रुपयांचा नवीन पोस्टपेड प्लॅन

VI कडे आधीपासूनच 401 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध

नवीन प्लॅनमध्ये काय मिळेल खास...

सहसा लोक फक्त Jio आणि Airtel च्या एकत्रित ऑफरवर लक्ष केंद्रित करतात, परंतु VI देखील भरपूर ऑफर देतात. यावेळी Vi ने 401 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी OTT HD सबस्क्रिप्शन दिले जाईल.

हे सुद्धा वाचा : Vivo V27 Pro Vs OnePlus 11R: एक उत्कृष्ट डिझाइनसह तर, दुसरा 100W जलद चार्जिंगसह सुसज्ज

Vi चा 401 रुपयांचा प्लॅन

युजर्सना दर महिन्याला 50 GB डेटा ऑफर केला जाईल. याशिवाय मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळेल. दरमहा 3 हजार SMS दिले जातील. तसेच, राष्ट्रीय अमर्यादित कॉल उपलब्ध असतील.

माहितीनुसार, Vi च्या नवीन 401 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनचे मेन फिचर म्हणजे 'Sun NXT चे प्रीमियम HD सबस्क्रिप्शन' होय. हे सब्स्क्रिप्शन वर्षभरासाठी दिले जात आहे. शिवाय, हे सबस्क्रिप्शन तुमच्या टीव्हीवर तसेच तुमच्या मोबाइल फोनवर काम करेल. सन NXT हे तमिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये कंटेंट देणारे सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे.

प्लॅनला 'Vi&N NXT 401 South Max पोस्टपेड प्लॅन' असे म्हटले जाते. हा प्लॅन घेणारे ग्राहक 'सन मराठी' आणि बांगला टीव्ही शो देखील पाहू शकतील. माहितीनुसार, ग्राहकांना प्रीमियम HD सबस्क्रिप्शन दिले जाईल. ते एका वर्षासाठी वैध असेल. ग्राहकांना ड्युअल स्क्रीन ऍक्सेस दिला जाईल, म्हणजे ते त्यांच्या मोबाईलवर तसेच टीव्हीवर Sun NXT Premium HD पाहू शकतील. एवढेच नाही तर ग्राहकांना Zee5 कंटेंटही पाहता येणार आहे. हा कंटेंट Vi Movies & TV ऍपवर उपलब्ध असेल.

VI कडे आधीपासूनच 401 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की Vi कडे आधीपासूनच 401 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. हा प्लॅन SonyLiv चे मोबाईल सबस्क्रिप्शन ऑफर करतो. म्हणजेच, दोन्ही प्लॅनमधील फरक फक्त OTT सबस्क्रिप्शनचा आहे. तुम्हाला Sun NXT सदस्यत्व नको असल्यास, तुम्ही SonyLiv मोबाइल सबस्क्रिप्शनसह प्लॅन खरेदी करू शकता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo