Vi Movies & TV ॲपमध्ये 13+ OTT ॲप्स आणि 400+ Live टीव्हीचा आनंद घ्या, जाणून घ्या किंमत। Tech News
कंपनीने विद्यमान Vi Movies & TV ॲपची अपडेटेड वर्जन जारी केले आहे.
Vi Movies & TV ॲपचा नवा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी 202 रुपयांमध्ये येतो.
Vi Movies आणि TV मेम्बर्सना यामध्ये 13 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे ऍक्सेस मिळेल.
भारतातील तिसरी मोठी खाजगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea VI त्यांच्या Vi Movies & TV ॲपद्वारे प्रेक्षकांच्या मनोरंजनाची सोय केली आहे. दरम्यान, कंपनीने विद्यमान Vi Movies & TV ॲपची अपडेटेड वर्जन जारी केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे कंपनीचे ‘Unlimited Entertainment App’ आहे, जे Vi वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी भरपूर मनोरंजन प्रदान करते. आता कंपनीने ॲप अपडेट केले आहे.
हे सुद्धा वाचा: Jio ची Dhan Dhana Dhan ऑफर! सुपरफास्ट चालेल तुमचे इंटरनेट, मिळेल तीनपट अधिक इंटरनेट स्पीड। Tech News
होय, आता या ॲपमध्ये तुम्हाला 13 हून अधिक OTT ॲप्सचा प्रवेश मिळेल. यासह, यात 400 हून अधिक Live TV चॅनेलचा ऍक्सेस देखील समाविष्ट आहे. चला जाणून घेऊया नव्या अपडेटेड वर्जनची किंमत आणि बेनिफिट्स-
Vi Movies & TV सबस्क्रिप्शन प्लॅन्सची किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, Vi Movies आणि TV साठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. हा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी 202 रुपयांमध्ये येतो. तर, पोस्टपेड ग्राहकांना हा प्लॅन 199 रुपयांना मिळेल. वापरकर्ते त्यांच्या स्मार्ट टीव्ही, अँड्रॉइड, गुगल टीव्ही, अँड्रॉइड फोन आणि वेबवर Vi Movies & TV मध्ये ऍक्सेस करू शकतात.
Vi Movies & TV सबस्क्रिप्शन बेनिफिट्स
Vi Movies आणि TV मेम्बर्सना यामध्ये 13 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे ऍक्सेस मिळेल. ज्यामध्ये Disney+ Hotstar आणि SonyLiv सारख्या OTT ॲप्सचा समाविष्ट असतील. वापरकर्ते या OTT प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन कंटेंट स्ट्रीम करण्यास सक्षम असतील. यासह यात डिस्कव्हरी, आज तक, रिपब्लिक भारत, एबीपी, इंडिया टुडे इ. 400 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा ऍक्सेस आहे. तर, तुम्ही Shemaroo आणि Hungama कंटेंट लायब्ररीमध्ये देखील ऍक्सेस मिळवू शकता.
रिजनल कंटेंट
रिजनल कंटेंटसाठी, त्यात Manorama Max, NammaFlix, Klikk, Chaupal आणि Korean dramas dubbed in Hindi from Playflix चा समावेश आहे. तर, Vi Movies आणि TV मध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी, बंगाली आणि कन्नड यांचा समावेश असलेल्या अनेक भाषांमध्ये ऍक्सेस दिला जाऊ शकतो. यासह आम्ही तुम्हाला सांगतो की, या ॲपद्वारे वापरकर्ते वेगवेगळ्या OTT ॲप्सच्या सदस्यता खरेदीचा खर्च देखील वाचवतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile