Vodafone-Idea ने वापरकर्त्यांसाठी चार नवीन प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीच्या या नवीन प्लॅनचे नाव Vi Max Plan असे आहे. यामध्ये रु. 401, रु. 501, रु. 701 आणि REDX रु. 1,101 च्या प्लॅन्सचा समावेश आहे. कंपनी या नवीन पोस्टपेड प्लॅन्समध्ये अमर्यादित डेटा आणि कॉलिंगसह दरमहा 3 हजार मोफत SMS देखील देत आहे. यापैकी काही प्लॅन्स Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Sony Liv वर मोफत सबस्क्रिप्शन देतात. विशेष बाब म्हणजे कंपनी 1,101 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षातून चार वेळा एअरपोर्ट लाउंजची सुविधाही देत आहे.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Redmi Smartphone Clearance sale सुरु, रु. 5000 मध्ये खरेदी करा जबरदस्त REDMI फोन्स
Vodafone-Idea च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 50 GB डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1 GB डेटासाठी 20 रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो. यामध्ये वोडा नाइट अनलिमिटेड डेटा देखील देत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दरमहा 3 हजार फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील देते. प्लॅनच्या सदस्यांना हंगामा म्युझिक आणि Vi Movies आणि TV सोबत Sony Liv मोबाईलवरही मोफत प्रवेश मिळेल.
कंपनीच्या या लेटेस्ट प्लॅनमध्ये 90 GB डेटा मिळतो. यामध्येही डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 1 GB डेटासाठी 20 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्येही दरमहा अनलिमिटेड कॉलिंग आणि 3 हजार मोफत SMS ही मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये रात्रीच्या वेळी अमर्यादित डेटाचा लाभही मिळतो. त्याबरोबरच, यामध्ये तुम्हाला Amazon Prime Video चे 6 महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळेल, Disney + Hotstar आणि Vi Movies आणि TV ऍप एक वर्षासाठी उपलब्ध असतील.
या प्लॅनच्या ग्राहकांना इंटरनेट वापरासाठी दरमहा अमर्यादित डेटा मिळेल. प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग आणि दरमहा 3,000 SMS पाठवण्याची सुविधाही दिली जात आहे. प्लॅनमध्ये कंपनी 6 महिन्यांसाठी Amazon Prime Video आणि Disney + Hotstar सुपर सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत देत आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटासह अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. दरमहा 3 हजार मोफत SMS देणाऱ्या या प्लॅनमध्ये कंपनी 6 महिन्यांचे Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Sony Liv एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षातून चार वेळा एअरपोर्ट लाउंज ऍक्सेस आणि वर्षातून एकदा 2,999 रुपयांचा इंटरनॅशनल रोमिंग पॅक मिळेल.