VI : दिवाळी ऑफरमध्ये युजर्सची मज्जाच मजा ! मोबाईल रिचार्जवर हॉटस्टारसह 75 GB डेटा मोफत

Updated on 18-Oct-2022
HIGHLIGHTS

Vodafone-Idea ने दिवाळी निमित्त अप्रतिम ऑफर

काही प्लॅन्ससह ग्राहकांना 75 GB डेटा मिळेल.

तसेच, डिजनी + हॉटस्टारचे मोफत सदस्यत्व देखील यामध्ये उपलब्ध

दिवाळीच्या मुहूर्तावर, टेलिकॉम कंपनी VIने युजर्ससाठी धमाकेदार दिवाळी ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना 18 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मोबाईल रिचार्जवर 75 GB पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. कंपनीची ही खास ऑफर 1,449 रुपये आणि 3,099 रुपयांच्या प्लॅनसाठी वैध आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दैनंदिन डेटा देखील मिळेल, ज्याची वैधता एक वर्षापर्यंत आहे. 

हे सुद्धा वाचा : त्वरा करा! अवघ्या काही दिवसांत संपणार Amazon सेल, बघा 32 इंच स्मार्ट TV वरील खास ऑफर्स

तसेच, यापैकी एका प्लॅनमध्ये, कंपनी एका वर्षासाठी Disney + Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन देखील ऑफर करत आहे. 

1449 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे

कंपनी या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता देत आहे. Vodafone-Idea चा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देखील देतो. प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज एकूण 1.5 GB डेटा मिळेल. तसेच, यामध्ये कंपनी दिवाळी ऑफर अंतर्गत 50 GB डेटा मोफत देत आहे.

VI चा 3,099 रुपयांचा प्लॅन

 हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा देत आहे. या दिवाळी ऑफर अंतर्गत, तुम्हाला या प्लॅनमध्ये 75 GB अतिरिक्त डेटा आणि Disney + Hotstar मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. तसेच, दररोज 100 SMS ऑफर करणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल.
 
त्याबरोबरच, कंपनी दोन्ही प्लॅनमध्ये अनेक उत्तम अतिरिक्त फायदे देखील देत आहे. यात बिंज ऑल नाईटचाही समावेश आहे. याअंतर्गत युजर्स दुपारी 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा मोफत वापरू शकतील. हे प्लॅन्स वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट अंतर्गत दरमहा 2GB पर्यंत बॅकअप डेटा देतात. या प्लॅनच्या सदस्यांना Vi Movies आणि TV VIP ऍपमध्ये मोफत प्रवेश देखील मिळतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :