Vodafone-Idea चे सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये OTT सब्स्क्रिप्शन मोफत
या प्लॅन्सची सुरुवातीची किंमत केवळ 82 रुपये आहे.
तसेच, Airtelच्या 181 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये देखील हॉटस्टार मोफत
Vodafone-Idea वापरकर्त्यांना उत्तम प्लॅन ऑफर करत आहे. जर तुम्हाला अधिक डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन खूप कमी खर्चात हवे असेल तर, Vodafone-Idea चा डेटा ऍड-ऑन प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कंपनीच्या डेटा प्लॅनची सुरुवातीची किंमत 82 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला Sony Liv आणि Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल. जाणून घेऊयात या खास स्वस्त आणि मस्त प्लॅन्सबद्दल सर्व काही…
Vodafone-Idea चा 82 रुपयांचा प्लॅन खूप चांगला आहे. कंपनी या प्लॅनमध्ये एकूण 4GB डेटा देत आहे. प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. कंपनीच्या या प्लॅनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी Sony Live Mobile चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.
वोडाफोन-आयडियाचा 151 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोनचा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 8 GB डेटा मिळेल. या प्लॅनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनी Disney + Hotstar चे 3 महिन्यांसाठी फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. डेटा पॅकमुळे तुम्हाला यामध्ये मोफत कॉलिंग आणि SMS चे फायदे मिळणार नाहीत.
Airtel त्याच्या 181 रुपयांच्या ऑफरमध्ये डिजनी + हॉटस्टारचे 3 महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. प्लॅनची एकूण वैधता 30 दिवस आहे. यात तुम्हाला दररोज 1 GB डेटा मिळेल. एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये इतर अनेक डेटा प्लॅन आहेत, परंतु ते Hotstar वर मोफत ऍक्सेस देत नाहीत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.