Xiaomi, Redmi युजर्ससाठी खुशखबर ! VI ने 5G सेवेबाबत केली मोठी घोषणा
Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन्सवर VI 5Gची चाचणी यशस्वी
बघा कोणत्या स्मार्टफोन्सवर मिळणार 5G सपोर्ट
JIO आणि AIRTEL ने जवळपास 500 शहरांमध्ये 5G सेवा लाँच
Xiaomi, Redmi युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Vodafone-Idea ने बुधवारी सांगितले की, त्यांनी टेलिकॉम ऑपरेटरची आगामी 5G सेवा काही निवडक Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन्सवर उपलब्ध करून देण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन्सवर VI 5Gची यशस्वी चाचणी झाली आहे आणि व्यावसायिक रोलआऊटसाठी FOTA अपडेट असणे आवश्यक आहे, असा दोन्ही कंपन्यांचा दावा आहे.
VI 5G सेवा रोलआउट करेल, तसे सर्व युजर्सना फोनचे अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. मात्र हे अद्याप स्पष्ट नाही की, सॉफ्टवेअर अपडेट लगेच उपलब्ध होईल की VI 5G सेवा रोलआऊट झाल्यानंतर येईल.
पुढील स्मार्टफोन्सवर मिळणार 5G सपोर्ट
Xiaomi 13 Pro, Redmi Note 12 Pro 5G, Redmi Note 12 Pro+ 5G, Redmi Note 12 5G, Xiaomi 12 Pro, Mi 11 Ultra, Mi 11X Pro, Xiaomi 11T Pro 5G, Xiaomi 11 लाइट, प्राइम आरएमआय 5जी K50i, Redmi Note 11T 5G, Redmi Note 11 Pro 5G, Mi 11X, Mi 10, Mi 10T, Mi 10T Pro, Mi 10i फोन समाविष्ट आहेत.
JIO आणि AIRTEL ने जवळपास 500 शहरांमध्ये 5G सेवा लाँच
JIO आणि AIRTEL ने देशातील जवळपास 500 शहरांमध्ये 5G सेवा लाँच केली आहे. मात्र, VI ने 5G सेवा लाँच करण्याबाबत अजूनही कुठलीच वेळ स्पष्ट केली नाही. त्यामुळे रोलआउट तर सोडाच पण टाइमलाईन देखील अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, कंपनी देशातील काही शहरांमध्ये 5G सेवेची चाचणी करत आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile