Vodafone-Idea आणि Jio वापरकर्त्यांना 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत पोस्टपेड प्लॅन्स
VI प्लॅनची ऑनलाईन सदस्यता घेतल्यास 150GB अतिरिक्त डेटा मोफत मिळतो
JIO चा प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
Vodafone-Idea आणि Reliance Jio यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीपेड प्लॅन्ससह अनेक उत्कृष्ट पोस्टपेड प्लॅन्स आहेत. वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या या प्लॅनमध्ये चांगले फायदे देत आहेत. तुम्ही कमी किमतीत सर्वात उत्तम प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन सर्वोत्तम आहे. Vodafone च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150 GB फ्री डेटा मिळेल. मात्र, Jio चा प्लॅन Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
प्लॅनमध्ये कंपनी 40 GB डेटा देत आहे. तुम्ही या प्लॅनची ऑनलाइन सदस्यता घेतल्यास, तुम्हाला 150GB अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. अशा प्रकारे, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 190 GB होईल. तसेच, यामध्ये तुम्हाला 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदाही मिळेल. VI चा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग बेनिफिटसह येतो. प्लॅनमध्ये, तुम्हाला Zee5 प्रीमियम चित्रपटांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. याशिवाय, कंपनी प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV ऍपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
JIO चा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
JIO च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 75 GB डेटा मिळेल. याशिवाय, कंपनी त्यात 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा लाभही देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला प्रति GB डेटासाठी 10 रुपये खर्च करावे लागतील. प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. दररोज 100 मोफत SMS सह हा प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
AIRTEL चा 399 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 399 रुपयांचा प्लॅनमध्ये कंपनी 200GB रोलओव्हर डेटासह 40GB मासिक डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS देखील उपलब्ध आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.