टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea VI वापरकर्त्यांना सर्वोत्तम बेनिफिटसह प्रीपेड योजना तसेच अनेक उत्कृष्ट पोस्टपेड योजना देत आहे. यापैकी एक 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांमुळे हा कमी खर्चात जबरदस्त प्लॅन आहे. कंपनी प्लॅनच्या सदस्यांना Zee5 प्रीमियमच्या मोफत सबस्क्रिप्शनसह 150 GB अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. चला जाणून घेऊयात या प्लॅनबाबत सविस्तर तपशील…
399 रुपये मंथली रेंटल असलेला हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम आहे, ज्यांना कमी किमतीत अधिक डेटा हवा असतो. कंपनी या प्लॅनमध्ये 40 GB डेटा देत आहे. प्लॅनबाबत विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 150 GB अतिरिक्त डेटा मिळेल आणि तोही अगदी मोफत. मात्र, 150 GB अतिरिक्त डेटा फक्त त्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल, ज्यांनी या प्लॅनचे ऑनलाइन सदस्यत्व घेतले आहे.
हे सुद्धा वाचा : Top OTT releases : Aashram3 पासून RRRपर्यंत, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सिरीज बघा
399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिटही उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये दरमहा 100 मोफत SMSसह देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील दिले जाते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Zee5 प्रीमियम आणि Vi Movies & TV चे मोफत सदस्यत्व समाविष्ट आहे.
Jio चा हा पोस्टपेड प्लॅन कमी किमतीत अनेक उत्तम फायदे देतो. यामध्ये इंटरनेट वापरासाठी कंपनी एकूण 75 GB डेटा देत आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर यूजरला 1 GB डेटासाठी 10 रुपये खर्च करावे लागतील. प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर लाभ देखील उपलब्ध आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMSसह अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar ची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.