खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सच्या किमतीत दरवाढ केल्यानंतर सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या 5G नेटवर्कची प्रतीक्षा केली जात आहे. होय, इतर कंपन्यांनी 5G लाँच केल्यापासून BSNL 5G ची आतुरतेने वाट पहिली जात आहे. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमची ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. कारण, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः BSNL 5G ची चाचणी केली असून त्यात कंपनीला यश आले आहे.
Also Read: 108MP कॅमेरासह Infinix Note 40X 5G भारतात लाँच, पहा किंमत आणि टॉप 5 फीचर्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, केंद्रीय मंत्री सिंधिया स्वतः सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) मध्ये ट्रायलसाठी पोहोचले होते. नवी दिल्ली येथील कॅम्पसमध्ये BSNL 5G ची चाचणी केली जात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी स्वत: BSNL च्या 5G तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉल केला. त्यांनी 5G नेटवर्कच्या क्षमतेची चाचणी घेतली.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट X वर पोस्ट शेअर करत BSNL 5G कॉल टेस्टिंगचा Video देखील शेअर केला आहे. या Video मध्ये ते 5G नेटवर्कवर व्हिडिओ कॉल करताना दिसत आहेत. म्हणजेच, या चाचणीनंतर हे स्पष्ट झाले की, युजर्सकडे BSNL चे 5G नेटवर्क सुद्धा लवकरच येणार आहे.
TCS ने BSNL सोबत 15,000 कोटी रुपयांचा करार केला आहे, ती भारतात डेटा सेंटर बनवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, TATA भारतातील चार क्षेत्रांमध्ये आपली डेटा केंद्रे तयार करणार आहे, ज्यामुळे देशातील BSNL 4G सुविधा मजबूत होतील. यासोबतच, TATA चे युनिट TCS 1000 गावांमध्ये BSNL 4G सेवा सुरू करण्यात आणि ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत करेल, अशी देखील माहिती मिळाली आहे.