Alert! मोफत रिचार्ज ऑफरच्या नावाखाली होतोय Scam, TRAI ने दिला मोठा इशारा

Alert! मोफत रिचार्ज ऑफरच्या नावाखाली होतोय Scam, TRAI ने दिला मोठा इशारा
HIGHLIGHTS

TRAI ने नोटीस जारी करून देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना नवीन स्कॅम्सबद्दल इशारा दिला आहे.

TRAI ने मोफत रिचार्ज ऑफरचा दावा करणाऱ्या चालू घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

सायबर क्राईम वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्कॅम मॅसेजेसची तक्रार करू शकता.

TRAI: आपण सर्वांना माहितीच आहे की, सध्या जगभरात स्कॅम वाढत चालले आहेत. दरम्यान, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने नोटीस जारी करून देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना नवीन स्कॅम्सबद्दल इशारा दिला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने लाखो मोबाईल वापरकर्त्यांना एका घोटाळ्यापासून सावध राहण्याचे आवाहन दिले आहे. TRAI ने मोफत रिचार्ज ऑफरचा दावा करणाऱ्या चालू घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

सविस्तर बोलायचे झाल्यास, नुकताच एक नवीन घोटाळा समोर आला आहे. यामध्ये स्कॅमर लोकांना SMS पाठवत आहेत, ज्यामध्ये ते दावा करतात की, मोबाईल यूजर्सना हा मेसेज TRAI कडून आला आहे. पाहुयात सविस्तर माहीती-

नव्या स्कॅमबद्दल TRAI ने केले सावध

आम्ही तुम्हाला सांगतो की, TRAI ने आपल्या WhatsApp Community पोस्टद्वारे या बनावट मोबाइल रिचार्ज घोटाळ्याविरोधात सर्व ग्राहकांना इशारा दिला आहे. TRAI ने सांगितले की, मोबाईल वापरकर्त्यांना असे SMS मिळत आहेत, ज्यामध्ये त्यांना फ्री रिचार्ज ऑफर देण्यात येत आहेत. ट्रायने एक नोटीस जारी करून स्पष्ट केले आहे की, “अशी कोणतीही ऑफर आपल्या बाजूने येत नाही आणि वापरकर्त्यांना या फसव्या मॅसेजबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.”

trai alert for new scam

TRAI ने पुढे सांगितले की, हॅकर्स युजरचे डिव्हाईस हॅक करण्यासाठी असे मेसेज पाठवत असतात. तुमचे फोन हॅक झाल्यास, स्कॅमर्स तुमच्या बँक खात्याची माहिती देखील मिळवू शकतील. ट्रायने अशा फसव्या कोणतेही मॅसेजेसची तक्रार करण्याचा सल्ला ग्राहकांना दिला आहे. लक्षात घ्या की, सायबर क्राईम वेबसाइटला भेट देऊन तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

स्कॅम्सपासून स्वतःचे बचाव ‘अशा’प्रकारे करा.

अशाप्रकारच्या स्कॅम्सपासून बचाव करण्यासाठी, प्रामाणिक मोबाइल रिचार्ज डील खासकरून टेलिकॉम कंपन्या ऑफर करतात, केवळ त्यावर विश्वास ठेववा. लक्षात घ्या की, कोणत्याही नवीन ऑफरबद्दल सविस्तर माहितीसाठी वापरकर्ते थेट त्यांच्या ऑपरेटरशी संपर्क साधू शकतात. किंवा टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. मात्र, अशा मेसेजमध्ये आढळणाऱ्या लिंक्सवर क्लिक करणे, टाळणेच योग्य राहील. जर तुम्ही या मॅसेजेच्या लिंकवर क्लिक केले तर, तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस देखील येऊ शकतात.

रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo