जर तुम्ही तीन महिन्यांची वैधता असलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर, या लेखात आम्ही तुम्हाला Jio च्या 666 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. जिओसोबत या प्लॅनचा रिचार्ज करून 150 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. त्याबरोबरच, येथे आम्ही Jio च्या 666 च्या प्लॅनची तुलना त्याच बजेटमध्ये येणाऱ्या Airtel आणि Vodafone Idea च्या प्रीपेड प्लॅनशी करून सांगणार आहोत. चला तर मग या प्रीपेड प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती बघुयात…
हे सुद्धा वाचा : 5G Auction : 5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स JIO ची 88,078 कोटी रुपयांची बोली
Amazon Pay UPI सह Jio च्या 666 रुपयांच्या रिचार्जवर 150 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, पेटीएम वॉलेट किंवा पेटीएम पोस्टपेड वरून पेमेंट केल्यावर 10 टक्के कॅशबॅक घेतला जाऊ शकतो. IDFC FIRST कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक म्हणजेच कमाल 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. याव्यतिरिक्त, Mobikwik UPI व्यवहारातून 5 % कॅशबॅक म्हणजेच कमाल 50 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय, MobiKwik वॉलेटमधून पेमेंट केल्यावर तुम्हाला 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
जिओच्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण डेटा 126 GB इतका आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. या प्रीपेड प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळेल.
एअरटेलच्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. हाय स्पीड डेटा मर्यादा पूर्ण केल्यावर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. या प्रीपेड प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तसेच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये Apollo 247 Circle, Fastag, मोफत Hello Tunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन यावर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
Vodafone Idea च्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, 1.5GB डेटा दररोज उपलब्ध आहे. डेटा मर्यादा गाठल्यावर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी केला जातो. या प्रीपेड प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जातात.
त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये Binge ऑल नाईट डेटा उपलब्ध आहे, जो रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत चालतो. वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये, संपूर्ण आठवड्याचा उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरला जाऊ शकतो. मनोरंजनासाठी Vi Movies & TV क्लासिकचा ऍक्सेस मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 2GB पर्यंत डेटा बॅकअप मिळतो.