Airtelचा मोठा निर्णय! रिचार्ज प्लॅनमधून काढून घेतली ही सुविधा, चित्रपट बघता येणार नाहीत
कंपनीने बहुतेक प्रीपेड प्लॅनमध्ये असलेली Amazon Prime Video Mobile Edition ट्रायल काढून घेतली.
एअरटेल थँक्स बेनिफिट्स अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होती.
ही ट्रायल सुविधा मोबाईलसाठीच असून केवळ एकदाच मिळते.
भारती एअरटेलने एका मोठा निर्णय घेऊन आपल्या यूजर्सना धक्का दिला आहे. कंपनीने त्यांच्या बहुतेक प्रीपेड प्लॅनमध्ये असलेली Amazon Prime Video Mobile Edition ट्रायल काढून घेतली आहे. एअरटेल थँक्स बेनिफिट्स अंतर्गत कंपनी 2021 पासून ही सुविधा देत आहे. रिचार्ज प्लॅनसह, वापरकर्त्यांना ऍमेझॉन प्राइम मोबाइलची एक महिन्याची विनामूल्य ट्रायल देण्यात येत होती. ज्याद्वारे वापरकर्ते चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही शोचा आनंद घेत होते. चला तर जाणून घेऊयात कोणकोणत्या रिचार्ज प्लॅनमधून एअरटेलने ही सुविधा काढून घेतली.
पुढील रिचार्ज प्लॅनमधून प्राइम व्हिडिओ ट्रायल सुविधा काढून घेतली
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, फक्त दोन एअरटेल प्रीपेड प्लॅन शिल्लक आहेत, ज्यामध्ये Amazon Prime Video Mobile Edition ची मोफत ट्रायल दिली जाते. या प्लॅनची किंमत 359 रुपये आणि 108 रुपये आहे. मात्र, ही सुविधा फक्त मोबाइलवर वापरली जाऊ शकते आणि वापरकर्त्याला फक्त एकदाच ट्रायल सुविधा मिळते.
हे सुद्धा वाचा : नवीन Apple MacBook Air आणि Pro लॅपटॉप लाँच, विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपयांनी स्वस्त
359 रुपयांच्या प्लॅन
359 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. प्लॅनमध्ये मोफत HelloTunes, Wink Music आणि Xtreame मोबाइल पैकसह प्राइम व्हिडिओ मोफत ट्रायल 28 दिवसांसाठी ऑफर केली जाते.
108 रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा 108 रुपयांचा प्लॅन डेटा पैक आहे. या पैकची वैधता तुमच्या सध्याच्या प्लॅनवर अवलंबून असेल. प्लॅनमध्ये फक्त 6 GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय मोफत HelloTunes, Wink Music आणि Prime Videoची 30 दिवसांची मोफत ट्रायल दिली जाते.
मात्र, मिळालेल्या माहितीनुसार वरील दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये यापुढे ऍमेझॉन प्राईम व्हीडिओचे ट्रायल मिळणार नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile