AIRTEL युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर कंपनीने आपल्या एका लोकप्रिय प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे. एका प्लॅनमध्ये आधीच्या किमतीतच जास्त वैधता आणि डेटा देण्यात येणार आहे. AIRTELने आपला 265 रुपयांचा प्रीपेड प्लॅन नवीन स्वरूपात आणला आहे. आधी या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1 GB डेटा आणि 28 दिसांची वैधता मिळत होती. मात्र, आता ग्राहकांना या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही तर वैधता डॆहील वाढवून मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात प्लॅनबद्दल सर्वकाही सविस्तरपणे….
हे सुद्धा वाचा : खरंच ? यावर्षी येणार नाही Bigg Boss OTT सीझन 2 ! मेकर्स प्रेक्षकांना देणार 'हे' मोठे सरप्राईज
या प्लॅनमध्ये आता 28 दिवसांच्या ऐवजी संपूर्ण 30 दिवसांची वैधता मिळणार आहे. त्याबरोबरच, दररोज 1 GB डेटा ऐवजी आता 1.5 GB डेली हाय स्पीड 4G डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये 28 GB ऐवजी आता एकूण 45 GB डेटा मिळणार आहे. 45 GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 65 Kbps होईल. थोडक्यात रिवाईज्ड प्लॅनमध्ये दोन दिवस अतिरिक्त वैधता आणि दररोज 500 MB डेटा जास्त मिळणार आहे.
डेटा आणि वैधतेशिवाय प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 SMS बेनिफिट देखील मिळणार आहेत. या 100 दैनंदिन SMSची मुदत संपल्यानंतर, वापरकर्त्यांना प्रति स्थानिक SMS 1 रुपये आणि प्रति STD SMS 1.5 रुपये आकारले जातील.
अलीकडेच AIRTEL ने चार नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. ज्यांची किंमत 109 रुपये, 111 रुपये, 131 रुपये आधी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने कन्फर्म केले आहे की, AIRTEL भारतात 5G नेटवर्क कनेक्शन आणण्यासाठी काम करत आहे. कंपनीने आधीच गुडगाव, मुंबई आणि हैदराबादमध्ये 3 Gbps स्पीडसोबत 5G नेटवर्कची टेस्टिंग केली आहे. एअरटेलने घोषणा केली आहे की स्पेक्ट्रम लिलावानंतर ते 2-3 महिन्यांत आपल्या वापरकर्त्यांसाठी रोलआउट सुरू करतील.