व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्स (VNO) त्या कंपन्या असतात, ज्या देशभर नेटवर्क किंवा स्पेक्ट्रम नसतानासुद्धा ब्रांडच्या अंतर्गत व्हॉईस आणि डेटा सेवा सादर करतात.
अंतर मंत्रालयी पॅनल टेलिकॉम कमिशनने सोमवारी व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्स (VNO) वर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्स (VNO) त्या कंपन्या असतात, ज्या देशभर नेटवर्क किंवा स्पेक्ट्रम नसतानासुद्धा ब्रांडच्या अंतर्गत व्हॉईस आणि डेटा सेवा सादर करतात.हे ह्यासाठी स्थापित दूरसंचार ऑपरेटरर्सकडून बँडविथ खरेदी करतात.
हा स्थापित दूरसंचार ऑपरेटर्संना अप्रयुक्त बँडविथलासुद्धा मुद्रीकरण करण्याची अनुमती देतात. ह्याचे ऑपरेशन सुरु केल्यानंतर कॉल रेटसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.
ही माहिती बिजनेस इनसायडरने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे, ह्या रिपोर्टनुसार, दूरसंचार आयोगने VNO’s साठी एक एकीकृत लायसेंस श्रेणीला मंजूरी दिली आहे. ह्याचे प्रवेश शुल्क 7.5 करोड रुपये असेल. हे परमिट १० वर्षांसाठी वैध राहिल.
VNO टेलिकॉम कंपनीद्वारे जाणारी सर्व टेलिकॉम सर्विसेस देण्यास सक्षम असेल, ज्यांच्याशी त्यांनी भागीदारी केली आहे. ते एकापेक्षा जास्त कंपन्यांच्या सेवांची विक्री करु शकतात.