जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला हाय स्पीड अमर्यादित इंटरनेट आणि कॉल्सचा लाभ घ्यायचा असेल, तर TATA कडे तुमच्यासाठी सर्वोत्तम प्लॅन्स आहेत. TATA PLAY FIBER तीन महिन्यांच्या वैधतेसह अनेक ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करतो. जर तुम्ही चांगला ब्रॉडबँड प्लॅन खरेदी करू इच्छित असाल, तर टाटा प्ले फायबर हा एक उत्तम पर्याय आहे. कारण हे प्लॅन तुम्हाला 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत अमर्यादित डेटा आणि संपूर्ण महिन्यासाठी फ्री कॉलिंग लाभ देतात.
हे सुद्धा वाचा : 55-इंच Xiaomi च्या 4K स्मार्ट टीव्हीवर तब्बल 25 हजार रुपयांची सूट, उत्तम एक्सचेंज ऑफर उपलब्ध
आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. जे 50 Mbps स्पीडपासून सुरू होतात आणि 1 Gbps स्पीडपर्यंत लाभ देतात. जाणून घेऊयात कंपनीने ऑफर केलेल्या तीन महिन्यांच्या ब्रॉडबँड प्लॅनशी संबंधित सर्व तपशील…
Tata Play Fiber 50 Mbps स्पीडसह बेस प्लॅन ऑफर करते. हा प्लॅन 1,797 रुपयांना तीन महिन्यांसाठी म्हणजेच 599 रुपये प्रति महिना उपलब्ध आहे. मात्र हे लक्षात घ्या की, आम्ही येथे नमूद केलेल्या किंमतींमध्ये 18% कर समाविष्ट नाही. तसेच, 3.3TB मंथली फेयर- युसेज- पॉलिसी (FUP) डेटा सर्व प्लॅन्समध्ये ऑफर केला गेला.
दुसरा प्लॅन 100 Mbps चा आहे, जो तीन महिन्यांसाठी 2,400 रुपये म्हणजेच रु. 800 प्रति महिना दरात येतो. त्यानंतर, 150 Mbps, 200 Mbps, 300 Mbps, 500 Mbps, आणि 1 Gbps प्लॅन रु. 3000, रु 3300, रु 4500, रु 6900 आणि रु 10,800 च्या प्लॅनमध्ये येतात. जे संपूर्ण तीन महिऱ्यांच्या वैधतेसह उपलब्ध आहेत.
हे सर्व प्लॅन वापरकर्त्यांना मोफत फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील देतात. परंतु यासाठी वापरकर्त्याला स्वतंत्रपणे इन्स्ट्रुमेंट खरेदी करावे लागेल. तसेच, यापैकी कोणत्याही प्लॅनमध्ये ओव्हर-द-टॉप (OTT) लाभ येत नाही.