Tata Docomo ने सादर केला हा नवीन प्लान, मिळेल 49GB डाटा आणि अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

Tata Docomo ने सादर केला हा नवीन प्लान, मिळेल 49GB डाटा आणि अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

हा प्लान Tata Docomo च्या त्या सर्व सर्कल्स मध्ये उपलब्ध आहे जिथे कंपनी Airtel सोबत ICR एग्रीमेंट मध्ये सर्विस देत आहे.

Tata Docomo ने 229 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे ज्याने कंपनी इतर ऑपरेटर्स ची बरोबरी करू शकेल. 229 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी 49GB डाटा, अनलिमिटेड वॉइस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS ऑफर करत आहे. या प्लान ची वैधता 35 दिवसांची आहे. हा प्लान कंपनी च्या प्रीपेड अनलिमिटेड प्लान्स सेक्शन मध्ये उपलब्ध आहे जिथे Rs 148, Rs 179, Rs 348, Rs 349 आणि Rs 499 चे प्लान्स आहेत. हा प्लान Tata Docomo च्या त्या सर्व सर्कल्स मध्ये उपलब्ध आहे जिथे कंपनी Airtel सोबत ICR एग्रीमेंट मध्ये सर्विस देत आहे. हा प्लान जुन्या आणि नवीन सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. 
या प्लान चे बेनेफिट्स
229 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 35 दिवसांसाठी प्रतिदिन 1.4GB डाटा मिळत आहे. एका दिवसात यूजर्स 250 मिनट्स वॉइस कॉल्स वापरू शकतील, ही लिमिट पूर्ण झाल्यावर यूजर्सना 30 पैसा प्रति मिनट चार्ज द्यावा लागेल. यूजर्स प्रतिदिन कोणत्याही नेटवर्क वर 100 SMS पाठवू शकतात. विशेष म्हणजे Tata आणि कंपनी च्या साइट्स वर रोमिंग इनकमिंग आणि आउटगोइंग फ्री असेल तर इतर नेटवर्क वर बेस टॅरिफ प्लान नुसार कॉल्स चार्ज केले जातील. प्लान मध्ये साप्ताहिक कॉल्स लिमिट बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. 
हा प्लान पण इतर ऑपरेटर्स प्रमाणे व्यावसायिक वापरासाठी नाही आहे. सध्या Docomo ची 4G सर्विस भारतात उपलब्ध नाही त्यामुळे हा डाटा 3G नेटवर्क वर उपलब्ध होईल. सध्यातरी कंपनी Airtel सोबत इंट्रा सर्किल रोमिंग एग्रीमेंट अंतर्गत सर्विस देत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo