RELIANCE JIOFIBER अनेक ऑफर्स सह झाला लॉन्च

RELIANCE JIOFIBER अनेक ऑफर्स सह झाला लॉन्च
HIGHLIGHTS

Reliance JioFiber broadband सर्विस भारतात लॉन्च

Rs 699 पासून सुरू होतात हे प्लान्स

Reliance Industries के चेअरमन Mukesh Ambani यांनी घोषणा केली होती की JioFiber ब्रॉडबँड सर्विस 5 सप्टेंबरला कमर्शियली सुरू केली जाईल. आता Reliance JioFiber broadband अधिकृतपणे सादर करण्यात आली आहे. ही सर्विस 1600 शहरांमध्ये सादर करण्यात आली आहे. याचे मासिक सब्स्क्रिप्शन प्लान Rs 699 पासून सुरू होतात आणि किमान 100Mbps चा स्पीड देतात. जियोफाइबर प्लान्स व्यतिरिक्त, कंपनीने काही आगामी जियो फाइबर सर्विसेजची माहिती पण दिली आहे, जसे की फ्री फिक्स्ड लँडलाईन, OTT ऍपचे फ्री सब्स्क्रिप्शन इत्यादी.

Reliance JioFiber plans

JioFiber प्लान्सची किंमत Rs 699 पासून सुरू होते आणि 100Mbps चा स्पीड यात मिळतो. नवीन ग्राहकांना डिपॉझिट म्हणून Rs 2,500 चे वन-टाइम पेमेंट द्यावे लागेल, ज्यात Rs 1500 सिक्योरिटी डिपॉजिट आहे आणि Rs 1,000 नॉन-रिफ़ंडेबल इन्स्टालेशन चार्जेस आहेत. जर यूजरने Rs 699 वाला प्लान सबस्क्राइब केला जो 'Bronze' नावाने समोर आला आहे तर या प्लान मध्ये अनलिमिटेड डेटा मिळेल पण हाई स्पीड 100GB + 50 GB पर्यंत मिळेल. हा डेटा संपल्यावर यूजर्स 1Mbps स्पीड वर इंटरनेट वापरू शकतात. अतिरिक्त डेटा इंटरोडक्टरी बेनिफिट अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत दिला जाईल. विशेष म्हणजे 1Mbps ची FUP पुढील सर्व JioFiber प्रीपेड रीचार्ज प्लान्स वर लागू असेल.

JioFiber चा पुढील प्लान Rs 849 चा प्रोपेड प्लान आहे ज्याला 'Silver’ असे नाव देण्यात आले आहे. या रीचार्ज ऑप्शन मध्ये 200GB हाई-स्पीड डेटा मिळेल. हाई-स्पीड ऑफर अंतर्गत 200GB इंटरोडक्टरी ऑफर दिली जाईल. Rs 699 च्या या प्लान प्रमाणे या प्लान मध्ये पण 100Mbps स्पीड सेट करण्यात आला आहे.

Rs 1,299 मध्ये आलेला Gold प्रोपेड प्लान 500GB मंथली डेटा सह येतो आणि याचा स्पीड 250 Mbps आहे. इंटरोडक्टरी ऑफर अंतर्गत, कंपनी या प्लान मध्ये 250GB डेटा ऑफर करत आहे. Rs 2,499 च्या प्लान बद्दल बोलायचे तर हा डायमंड JioFiber प्लान 1250GB मंथली डेटा सह येतो आणि याचा स्पीड 500Mbps आहे. या प्लान मध्ये इंटरोडक्टरी ऑफर अंतर्गत सह महिन्यांसाठी अतिरिक्त 250GB डेटा मध्ये मिळत आहे.

ज्या यूजर्सना हाई बँडविड्थ आणि डेटा हवा आहे ते Rs 3,999 वाल्या प्लॅटिनम प्लानला सब्सक्राइब करू शकतात जो 1Gbps स्पीड वर 2500GB डेटा ऑफर करत आहे. तसेच , Titanium JioFiber प्लान पाहता Rs 8,499 चा प्लान 1Gbps स्पीड सह 5000GB डेटा ऑफर करतो.

वर सांगितलेल्या JioFiber प्रोपेड प्लान्स मध्ये फ्री वॉइस बेनिफिट आणि TV विडियो कॉलिंगचा लाभ पण मिळेल. JioFiber इंटरनेट सर्विस मध्ये झिरो लेटेंसी गेमिंग आणि होम नेटवर्किंग सर्विस सारखे कंटेन्ट शेयरिंग इत्यादींचा पण समावेश आहे. त्याचबरोबर सर्विस मध्ये Norton डिवाइस सिक्योरिटी पण मिळते जी 5 डिवाइसेज पर्यंत मर्यादित आहे. JioFiber Platinum आणि Titanium प्लांस मध्ये यूजर्स VR कंटेन्ट ऍक्सेस करू शकतात आणि त्याचबरोबर फर्स्ट डे फर्स्ट शो मूवीज आणि स्पेशल स्पोर्ट्स कंटेन्टचा पण नंद घेऊ शकतात.

JIOFIBER WELCOME OFFER DETAILS

Jio काही होम गेटवे डिवाइसेज पण देत आहे आणि सर्व जियो फाइबर प्लॅन्स सोबत Jio 4K Set Top Box फ्री आहे. Bronze JioFiber सब्स्क्रिप्शन मध्ये यूजर्सना तीन महिन्यांसाठी जियोसिनेमा आणि जियोसावन चे ऍक्सेस मिळेल. जर यूजर्स सिल्वर प्लान कडे गेले तर त्यासोबत त्यांना तीन महिन्यांचे OTT ऍप्सचे सब्स्क्रिप्शन फ्री मिळेल, पण अजूनही जियो ने याचा पुरेपूर खुलासा केला नाही. Gold, Diamond आणि Platinum जियोफाइबर प्रोपेड प्लान सब्सक्राइबर्सना एका वर्षासाठी OTT ऍप्सचे फ्री ऍन्युल सब्स्क्रिप्शन मिळेल.

JIOFIBER LONG TERM PLANS

JioFiber तीन, सहा आणि 12 महिन्यांसाठी प्लॅन्स ऑफर करत आहे. Jio लवकरच बँकांसोबत भागेदारी करून EMI स्कीमची पण घोषणा करेल. 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo