Reliance Jio सध्या आपल्या ब्रॉडबँड सर्विस JioFiber ची टेस्टिंग करत आहे आणि सोबत कंपनी ने 1.1TB FUP लिमिट आहे 100 Mbps ब्रॉडबँड कनेक्शन ऑफर करणे सुरू केले आहे. या वर्षाच्या दुसर्या तिमाही पर्यंत Reliance Jio आपली JioFiber ब्रॉडबँड सर्विस सादर करणार आहे आणि कंपनी ने या स्पर्धेला गांभीर्याने घेतले आहे.
अशी मिळेल 1.1TB FUP लिमिट
आता पर्यंत Jio ने 100GB FUP सह 100 Mbps कनेक्शन ऑफर केले आहे. पण 100GB FUP आता जुनी झाली आणि यूजर्सना मासिक आधारावर अजून जास्त डाटा FUP पाहिजे, ज्यामुळे FUP 1.1TB पर्यंत वाढवण्यात आली आहे. पण, रिपोर्ट नुसार Jio एकदम 1.1TB FUP देणार नाही. वेलकम ऑफर पीरियड मध्ये कंपनी 100GB ची FUP ऑफर करेल आणि सोबत कंपनी डाटा अॅड-ऑन पॅक सादर करेल जे यूजर्सना मॅन्युअली एक्टिवेट करावे लागतील. एका अन्य रिपोर्ट नुसार, Jio आता फाइबर-टू-दा-होम (FTTH) ब्रॉडबँड प्लान मध्ये 100GB FUP सह 100 Mbps ऑफर करेल. एकदा 100GB FUP पूर्ण झाल्यास यूजर्स महिन्यातून 25 वेळा 40GB डाटा टॉप-अप एक्टिवेट करू शकतील, ज्यामुळे एकूण डाटा 1.1TB होतो. याचा अर्थ असा की कनेक्शन एक्टिवेट झाल्यानंतर कंपनी फक्त 100GB डाटा ऑफर करेल.
30 मोठया शहरांमध्ये उपलब्ध होईल ही सर्विस
रुमर्स नुसार Jio आपले होम ब्रॉडबँड आणि एंटरप्राइज ब्रॉडबँड प्लान सादर करेल आणि कंपनी लॉन्च नंतर 30 शहरांमध्ये 100 मिलियन होम ब्रॉडबँड यूजर्स पर्यंत पोहचेल. हा एक छोटा आकडा आहे कारण कंपनी तीन महिन्यांसाठी किंवा त्याही पेक्षा जास्त वेळे साठी फ्री FTTH सर्विस ऑफर करेल. सर्विस अधिकृतपणे लॉन्च झाल्या नंतर देशातील 30 मोठया शहरांमध्ये उपलब्ध होईल. कंपनी आधीच काही मोठ्या शहरांमध्ये JioFiber चा प्रीव्यू ऑफर करत आहे, या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली-NCR, अहमदाबाद, जामनगर, सूरत, वडोदरा, चेन्नई, हैदराबाद आणि बँगलोर इत्यादींचा समावेश आहे.