5G सेवा सुरु झाल्यापासून टेलिकॉम कंपंन्यांनी आपल्या पूर्वीच्या प्लॅन्समध्येच नवी सेवा ग्राहकांना देऊ केली आहे. होय, नवीन सेवा सुरु झाल्यापासून टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या नाहीत. त्यामुळे, देशातील दूरसंचार कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या मोबाईल प्लॅनच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. पण एका अहवालानुसार देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स Jio याला अनुकूल वाटत नाही. वास्तविक, कंपनीने स्पष्ट केले आहे की, ते 5G सेवेसाठी वापरकर्त्यांच्या प्लॅनमध्ये कोणतीही वाढ करणार नाही.
होय, हे ऐकून तुम्हालाही आनंदाचा धक्का बसला ना. म्हणजेच तुम्हाला आधीच्या प्लॅन्सच्या किमतीत कोणतीही वाढ दिसणार नाही. प्लॅन्स तसेच राहतील परंतु सेवेमध्ये अपग्रेड उपलब्ध असतील.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमन म्हणाले की, कंपनी टॅरिफमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याचा विचार करत नाहीये. कंपनीचे लक्ष सध्या अशा ग्राहकांवर आहे, ज्यांना डेटा प्लॅनवर स्विच करायचे आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांचे हे व्हिजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याशिवाय, कंपनीच्या अध्यक्षांनी माहिती दिली की, ”20 कोटींहून अधिक ग्राहक अजूनही 2G सेवाच वापरत आहेत. त्यांना डिजिटल पद्धतीने सक्षम करणे ही उद्योगांची जबाबदारी आहे. देशाला 2G मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वस्त दरात सेवा देणे होय.” पुढे ओमेन म्हणाले की, ”सर्व भारतीयांना डेटा मिळायला हवा. आम्ही त्यांना यापासून दूर ठेवू शकत नाही. आम्ही सर्व भारतीयांना उत्कृष्ट ग्राहक अनुभव देऊ इच्छितो. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल कोणत्याही दूरसंचार कंपनीच्या आर्थिक आरोग्याचा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो.”
मिळालेल्या माहितीनुसार, Airtel आणि Vodafone Idea ला सरासरी महसूल वाढवण्यासाठी दर वाढवायचे आहेत. Airtel आणि Vodafone Idea दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. कॅपेक्स वाढवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे, असे कंपन्यांचे मत आहे.