Reliance Jio विरुद्ध वोडाफोन, विरुद्ध एयरटेल विरुद्ध आईडिया: 1000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट अनलिमिटेड पोस्टपेड प्लान

Reliance Jio विरुद्ध वोडाफोन, विरुद्ध एयरटेल विरुद्ध आईडिया: 1000 रुपयांच्या आत येणारे बेस्ट अनलिमिटेड पोस्टपेड प्लान
HIGHLIGHTS

वेगवेगळ्या किंमतीच्या आधारावर रिलायंस जियो, वोडाफोन, एयरटेल आणि आईडिया कडे अनेक चांगले आणि दमदार पोस्टपेड प्लान्स आहेत. आज आम्ही 1000 रुपयांमध्ये येणारे पोस्टपेड रिचार्ज प्लान्स बद्दल बोलणार आहोत.

एकीकडे प्रीपेड रिचार्ज प्लान्सची यादी खूप मोठी आहे पण कुठे ना कुठे तर हे पोस्टपेड रिचार्ज प्लान्सच्या पुढे फीकी आणि छोटी पडते. कारण अनेक असे यूजर्स आहेत जे पोस्टपेड रिचार्ज प्लान्स मध्ये जास्त फायदा घेत आहेत. आजकल पोस्टपेड प्लान्स मध्ये तुम्हाला आधीपेक्षा जास्त डेटा आणि सुविधा मिळायला सुरवात झाली आहे. पण जेव्हा पोस्टपेड प्लान्स मधून एखादा प्लान निवडण्याची वेळ येते तेव्हा कोणत्याही कंपनी कडे जास्त ऑफर नसतात. तुम्हाला जसा हवातसा प्लान शोधणे कठीण जाऊ शकते. 

आज आम्ही काही 1000 रुपयांच्या आत येणाऱ्या पोस्टपेड प्लान्स बद्दल बोलणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या साठी कोणता प्लान जास्त चांगला असणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की तुम्हाला या सर्वच पोस्टपेड प्लान्स जे खाली देण्यात आले आहेत, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह येतात. या सर्व प्लान्सची वैधता एका महिन्याची असते. 

Rs 400 मध्ये येणारे बेस्ट पोस्टपेड प्लान

या श्रेणीत जास्तीत जास्त पोस्टपेड प्लान्स Rs 399 मध्ये येतात. पण रिलायंस जियो कडून या श्रेणीत पण तुम्हाला कमी किंमतीत चांगला प्लान मिळतो. रिलायंस जियो कडे Rs 199 वाला प्लान आहे, जो तुम्हाला 25GB डेटा ऑफर करतो, या रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला जियो च्या अनेक ऍप्सचा ऍक्सेस पण मिळतो. तसेच तर तुम्ही तुमचा निर्धारित डेटा संपवला तर तुम्हाला Rs 20 प्रति GB या हिशोबाने पैसे द्यावे लागतील. 

आता वोडाफोन आणि आईडिया बद्दल बोलूयात, या दोन्ही कंपन्यांकडे Rs 399 मध्ये येणारे पोस्टपेड प्लान आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला 40GB डेटा मिळत आहे, या प्लान मध्ये तुम्हाला 200GB ची रोलओवर लिमिट पण मिळत आहे. आर वोडाफोन बद्दल बोलायचे तर यात अमेझॉन प्राइम चे सब्सक्रिप्शन आणि वोडाफोन प्ले चे सब्सक्रिप्शन एका वर्षासाठी फ्री दिले जात आहे. तर आईडिया सोबत तुम्हाला आईडिया च्या ऍप्सचा ऍक्सेस मिळत आहे. 

आता एयरटेल बद्दल बोलायचे तर त्यांच्याकडे पण Rs 399 मध्ये येणारा एक प्लान आहे जो तुम्हाला 40GB डेटा ऑफर करतो, यात पण तुम्हाला 200GB ची रोलओवर लिमिट मिळत आहे. पण वोडाफोन प्रमाणे तुम्हाला एयरटेल मध्ये पण अमेझॉन प्राइमचे एक वर्षाचा ऍक्सेस आणि अजून बरेच काही नाही मिळत आहे. 

Rs 500 मधील बेस्ट पोस्टपेड प्लान

जेव्हा जेव्हा जियो चे नाव येते तेव्हा तेव्हा हि कंपनी इतर टेलीकॉम कंपनांच्या पुढेच दिसते. या श्रेणीत वोडाफोन कडे Rs 499 मध्ये येणारा एक प्लान आहे जो तुम्हाला 75GB डेटा ऑफर करतो. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला 200GB रोलओवर डेटा पण मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला या रिचार्ज प्लान सोबत बरेच काही वोडाफोन कडून मिळत आहे, जो तुम्ही वोडाफोनच्या साइट वर जाऊन बघू शकता. 

आता एयरटेल बद्दल बोलायचे तर कंपनीच्या Rs 499 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये असेच काहीसे फायदे मिळत आहेत, जे तुम्हाला वोडाफोन मध्ये पण मिळत होते. या प्लान मध्ये पण तुम्हाला डेटा आणि अन्य सुविधांच्या व्यतिरिक्त बरेच काही मिळत आहे, जे तुम्ही एयरटेलच्या साइट वर जाऊन बघू शकता. 

Rs 500-Rs 1000 मध्ये येणारे बेस्ट पोस्टपेड प्लान

आता जरा आपण काही महाग आणि जास्त किंमतीती येणाऱ्या प्लान्स बद्दल बोलूयात. आईडिया आणि वोडाफोन दोन्ही कंपन्यांकडे कडे Rs 999 मध्ये येणारे प्लान आहेत. या दोन्ही प्लान्स मध्ये तुम्हाला 100GB डेटा प्रतिमाह दिला जात आहे, तसेच तुम्हाला या प्लान्स मध्ये 200GB डेटा रोलओवर ची सुविधा पण मिळत आहे.

सेच तुम्हाला यात 50 मिनिटांचे ISD कॉल पण मिळत आहेत. त्याचबरोबर वोडाफोन आपल्या या प्लान मध्ये तुम्हाला अजूनही खूप काही देत आहे, तुम्ही त्याची माहिती वोडाफोनच्या साइट वर जाऊन घेऊ शकता. 

एयरटेल कडे या श्रेणीत दोन प्लान्स आहेत हे प्लान तुम्हाला Rs 649 आणि Rs 799 मध्ये मिळतात. तसेच ए 90GB आणि 100GB डेटा पण क्रमश: ऑफर करत आहेत.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo