500 रुपयांमध्ये येणारे बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लान
आज आम्ही तुम्हाला रिलायंस जियो, वोडाफोन, एयरटेल आणि आईडिया च्या बाजारात उपलब्द असलेल्या काही सर्वात शानदार प्लान्स बद्दल सांगणार आहोत. इतकेच नव्हे तर आम्ही या प्लान्सची 500 रुपयांच्या आत तुलना पण करणार आहोत आणि कोणता प्लान तुमच्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला रिलायंस जियो, वोडाफोन, एयरटेल आणि आईडिया च्या बाजारात उपलब्द असलेल्या काही सर्वात शानदार प्लान्स बद्दल सांगणार आहोत. इतकेच नव्हे तर आम्ही या प्लान्सची 500 रुपयांच्या आत तुलना पण करणार आहोत आणि कोणता प्लान तुमच्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला सांगणार आहोत.
जवळपास सर्व टेलीकॉम कंपन्या डेटा आणि मोबाईल इंटरनेट युद्धात एकमेकांपेक्षा पुढे जाण्यासाठी निरंतरप्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यात आपण बघत आहोत की कोणती ना कोणती कंपनी आपल्या कोणत्या ना कोणत्या नवीन प्लान सह बाजारात येत आहे. आजकल कंपन्या सतत नवनवीन प्लान आणत आहेत त्यामुळे तुम्ही एखाद्या नेटवर्क वर पोर्ट करण्याचा विचार करू शकता किंवा या नवनवीन प्लान्स मुळे तुमचा गोंधळ उडू शकतो, की नेमक्या कोणता आणि कोणत्या कंपनीचा प्लान जास्त चांगला असणार आहे. आज आम्ही तुमची हि समस्या सोडवणार आहोत, आज आम्ही रिलायंस जियो, वोडाफोन, एयरटेल आणि आईडिया च्या काही अश्या प्लान्स मध्ये तुलना करून तुम्हाला सांगणार आहोत, जो प्रत्येक कंपनीचे बेस्ट प्लान आहेत. आज आम्ही 500 रुपयांच्या आत येणाऱ्या प्लान्स मध्ये तुलना करून तुम्हाला दाखवणार आहोत की नेमका तुमच्यासाठी कोणत्या कंपनीचा प्लान जास्त चांगला असणार आहे. चला तर मग सुरु करूया आणि जाणून घेऊया.
प्रीपेड रिचार्ज प्लान जे Rs 149 ते Rs 199 मध्ये येतात
काही दिवसांपूर्वीपर्यंत देशातील जवळपास सर्वच टेलीकॉम कंपन्यांकडे एक असा प्लान होता जो Rs 149 मध्ये येत होता. पण फक्त रिलायंस जियो ला सोडून इतर सर्व कंपन्यांनी हा प्लान वाढवून त्याची किंमत Rs 199 केली आहे. जर जियो च्या Rs 149 मध्ये येणाऱ्या रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला 42GB 4G डेटा मिळत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला 1.5GB प्रतिदिन या हिशोबाने डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. याव्यतिरिक्त जर Rs 199 मध्ये येणाऱ्या वोडाफोन, आईडिया आणि एयरटेल चे प्लान्स पहिले तर या कंपनीच्या यूजर्सना या किंमतीती Rs 1.4GB डेली डेटा मिळत आहे, आणि यात पण तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळत आहे.
तर जियो च्या Rs 199 मध्ये येणाऱ्या प्लानची चर्चा करायची झाल्यास या कंपनी कडे पण हा प्लान आहे पण यात रिलायंस जियो कडून 2GB डेली डेटा दिला जात आहे. तसेच जर इतर सुविधा पाहता त्याच सुविधा मिळतात ज्या तुम्हाला जियो कडून मिळतात. म्हणजेच तुम्हाला Rs 149 आणि Rs 199 मध्ये येणाऱ्या रिलायंस जियोच्या प्रीपेड रिचार्ज प्लान जियोच्या अनेक ऍप्स आणि सर्व्हिस मध्ये सूट मिळत आहे.
Rs 200 ते Rs 299 मध्ये येणारे प्रीपेड प्लान
पाहून यांना थोडे महाग प्लान्स म्हणू शकतो किंवा मग यांना मिड-रेंज प्रीपेड रिचार्ज प्लान्स पण म्हणता येईल. विशेष म्हणजे सर्व कंपन्यांकडे असे प्लान्स आहेत जे या किंमतीती येतात आणि त्या सर्वांमध्ये तुम्हाला वेगवेगळा डेटा मिळत आहे. पण या श्रेणीत पण जियो सर्वात चांगला प्लान तुम्हाला देत आहे. रिलायंस जियो चा Rs 299 मध्ये येणारा प्रीपेड रिचार्ज प्लान पाहता या किंमतीती तुम्हाला रिलायंस जियो कडून 84GB डेटा मिळत आहे, या प्लानची वैधता 28 दिवस आहे, आणि या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 3GB डेटा डेली दिला जात आहे. त्याचबरोबर कंपनी कडे अजून एक प्लान आहे ज्याला क्रिकेट प्लान बोलेल जाते, जो तुम्हाला 51 दिवस वैधतेसह 2GB डेली डेटा ऑफर करतो.
वोडाफोन कडे पण या किंमतीती येणारे दोन रिचार्ज प्लान आहेत. कंपनी कडे Rs 109 आणि Rs 255 मध्ये येणारे प्लान्स आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला क्रमश: 1.5GB आणि 2GB डेटा मिळत आहे, तसेच या दोन्ही प्लान्सची वैधता 28 दिवस आहे. एयरटेल बद्दल बोलायचे तर कंपनी कडे या श्रेणीत एक Rs 249 मध्ये येणार प्लान आहे, जो तुम्हाला 2GB डेली डेटा 28 दिवस देतो. तसेच एयरटेलचा Rs 249 मध्ये येणार प्लान पाहता कंपनी तुम्हाला आपल्या या रिचार्ज प्लान मध्ये 2GB डेली डेटा 28 दिवसांसाठी देत आहे.
तसेच आईडिया कडे Rs 227 आणि Rs 295 मध्ये येणारे प्रीपेड रिचार्ज प्लान्स आहेत, या प्लान्स मध्ये तुम्हाला 28 दिवस वैधता आणि 42GB डेटा मिळत आहे.
Rs 300 ते Rs 500 मध्ये येणारे प्लान
इथे पण तुम्हाला रिलायंस जियो पुढे दिसेल. रिलायंस जियो कडे एक Rs 349 मध्ये येणार रिचार्ज प्लान आहे. या प्लान मध्ये रिलायंस जियो कडून 105GB डेटा दिला जात आहे. हा 1.5GB डेली डेटा म्हणून तुम्हाला 70 दिवस दिला जातो. तसेच कंपनीचा अजून एक प्लान Rs 399 की मध्ये येतो, जो तुम्हाला 1.5GB डेटा ऑफर करतो. पण या प्लान मध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच कंपनी कडे Rs 448 आणि Rs 498 मध्ये येणारे दोन अजून प्लान पण आहेत जे तुम्हाला क्रमश: 84 दिवस आणि 91 दिवस वैधतेसह मिळतात.
आता वोडाफोन बद्दल बोलूयात, कंपनीकडे या श्रेणीत Rs 349, Rs 399 आणि Rs 479 मध्ये येणारे प्लान आहेत जे तुम्हाला क्रमश: 28 दिवस, 70 दिवस दिन आणि 84 दिवस वैधतेसह मिळत आहेत.
एयरटेल बद्दल बोलायचे झाले तर एयरटेल कडे तीन प्लान आहेत जे या श्रेणीत येतात. हे प्लान्स कंपनीकडे Rs 399, Rs 448 आणि Rs 499 मध्ये येणारे प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. हे प्लान तुम्हाला क्रमश: 70 दिवस, 82 दिवस आणि 82 दिवसाची वैधता देतात.
त्याचप्रमाणे आईडिया कडे या श्रेणीत येणारे दोन प्लान्स आहेत. कंपनी कडे क्रमश: Rs 309 आणि Rs 345 मध्ये येणारे प्लान्स आहेत, तसेच अजून एक प्लान Rs 392 मध्ये तुम्हाला मिळतो सोबत कंपनी कडे अजून दोन प्लान आहेत जे Rs 398 आणि Rs 449 मध्ये येतात.