रिलायंस जियो विरुद्ध वोडाफोन विरुद्ध एयरटेल Rs 300 च्या आत येणारे प्लान्स

Updated on 16-Jan-2019
HIGHLIGHTS

रिलायंस जियो, वोडाफोन आणि एयरटेल सध्या भारतीय टेलिकॉम बाजारात नंबर 1 कंपन्यां आहेत आणि आम्ही या कंपन्यांच्या त्या प्लान्स मध्ये तुलना करत आहोत जे 300 रुपयांच्या श्रेणीत येतात आणि 2GB किंवा त्यापेक्षा जास्त डेटा देतात.

रिलायंस जियो भारतीय टेलिकॉम बाजारात किफायती प्रीपेड प्लान्स सह आली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत सर्व भारतीय टेलिकॉम कंपन्या किफायती प्लान्स आणत आहेत आणि आपल्या आधीच्या प्लान्स मध्ये पण बदल करत आहेत.

भारतात एयरटेल, रिलायंस जियो आणि वोडाफोन मोठे टेलिकॉम प्रोव्हायडर्स आहेत जे अनेक एकसारखेच प्रीपेड प्लान्स ऑफर करतात. आम्ही एक लिस्ट तयार केली आहे ज्यात एयरटेल, वोडाफोन आणि रिलायंस जियोचे ते टॉप प्रीपेड प्लान्स ऍड केले आहेत जे Rs 300 च्या श्रेणीत येतात आणि प्रतिदिन  2GB डेटा देतात.

रिलायंस जियोचा Rs 299 चा प्रीपेड प्लान

रिलायंस जियो आपल्या Rs 299 च्या प्रीपेड प्लान मध्ये डेटा, कॉलिंग आणि SMS बेनिफिट ऑफर करत आहे. Rs 299 च्या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये युजर्सना प्रतिदिन 3GB 4G डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळतात आणि या प्लानची वैधता 28 दिवस आहे ज्यामुळे युजर्सना संपूर्ण वैधतेसाठी 84GB पर्यंतचा डेटा मिळतो.

रिलायंस जियोच्या या प्लान सोबत आपल्या ग्राहकांना जियो टीवी, जियो मनी आणि इतर अनेक ऍप्सचे ऍक्सेस देत आहे. प्लान अंतर्गत प्रतिदिन 3GB डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर इन्टरनेट स्पीड 64Kbps होतो.

वोडाफोनचा Rs 255 चा प्रीपेड प्लान

वोडाफोनच्या Rs 255 च्या प्रीपेड प्लान मध्ये युजर्सना प्रतिदिन 2GB 4G/3G/2G डेटा मिळतो ज्याची वैधता 28 दिवस आहे. डेटा बेनिफिट व्यतिरिक्त, युजर्सना अनलिमिटेड लोकल, STD, प्रतिदिन 100 SMS आणि रोमिंग कॉल्सचा लाभ मिळत आहे. युजर्स कंपनीच्या लाइव टीवी, मूवीज आणि ऑनलाइन कॉन्टेंट ऍपचा लाभ पण घेऊ शकतात.

वोडाफोनच्या या प्लान मध्ये युजर्सना पूर्णपणे अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळत नाही. यूज़र्स प्रतिदन 250 मिनट्स आणि प्रति सप्ताह 1,000 मिनट्स वापरू शकतात.

एयरटेलचा Rs 249 चा प्रीपेड प्लान

या श्रेणीत एयरटेलचा Rs 249 वाला प्रीपेड प्लान आहे. या प्लान अंतर्गत युजर्सना 28 दिवसांच्या वैधतेसाठी प्रतिदिन 2GB डेटा मिळत आहे. हा प्रीपेड प्लान अनलिमिटेड लोकल/STD आणि रोमिंग कॉल ऑफर करतो.

युजर्सना एयरटेलच्या या इस प्रीपेड प्लान मध्ये प्रतिदिन 100 SMS सोबत एयरटेलच्या डिजिटल कन्टेन्ट ऍप्स ज्यात एयरटेल TV, विंक म्यूजिक इत्यादींचा समावेश आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :