Jio Vs Airtel Rs 395 Plan: दोन्ही टेलिकॉम दिग्गज कंपन्यांकडे समान किमतीत प्लॅन उपलब्ध, तुमच्यासाठी कोण आहे Best? 

Jio Vs Airtel Rs 395 Plan: दोन्ही टेलिकॉम दिग्गज कंपन्यांकडे समान किमतीत प्लॅन उपलब्ध, तुमच्यासाठी कोण आहे Best? 
HIGHLIGHTS

रिलायन्स Jio आणि भारती Airtel चा 395 रुपयांच्या प्लॅन

रिलायन्स Jio च्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळेल.

Airtel चा 395 रुपयांच्या प्लॅन एकूण 70 दिवसांच्या वैधतेसह येतो.

रिलायन्स Jio आणि भारती Airtel हे दोन्ही भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांचे 5G नेटवर्क सध्या जवळपास संपूर्ण देशात पसरले आहे. दोन्ही कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक अप्रतिम आणि आकर्षक प्लॅन्स ऑफर करतात. दोन्ही कंपन्यांकडे बजेट ते एक्सपेन्सिव्ह या श्रेणीमध्ये प्लॅन्स उपलब्ध आहेत. दोन्ही कंपन्या समान किमतीत अनेक प्लॅन्स ऑफर करतात.

Also Read: लेटेस्ट Oppo F27 Pro+ 5G भारतीय बाजारात लाँच! पाण्यातही वापरता येईल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel च्या 395 रुपयांच्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स उत्तम वैधता आणि आकर्षक बेनिफिट्ससह येतात.

रिलायन्स Jio चा 395 रुपयांच्या प्लॅन

आम्ही तुम्हाला सांगतो की, 395 प्रीपेड रिचार्ज प्लॅन केवळ My Jio ॲपवर उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची म्हणजे जवळपास तीन महिन्यांची आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 6GB हाय-स्पीड 4G डेटा चा लाभ मिळेल. हा डेटा कोटा संपताच इंटरनेट स्पीड 64kbps कमी होईल. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये 1000 SMS ची सुविधा मिळेल.

Reliance Jio Rs 395 Prepaid Plan

Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनचे सर्वात मोठे फिचर म्हणजे यामध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटाचा लाभ मिळेल. मात्र, यासाठी तुमच्याकडे 5G फोन हवा आणि तुम्ही 5G क्षेत्रात राहणे, आवश्यक आहे. याशिवाय, वापरकर्त्यांना यात JioTV, JioCinema आणि JioCloud चे देखील ऍक्सेस मिळेल.

Airtel चा 395 रुपयांच्या प्लॅन

भारती Airtel कडे 395 रुपयांचा लॉन्ग टर्म प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या की, हा प्लॅन आता एकूण 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये देखील Jio प्रमाणेच 6GB हाय-स्पीड डेटा मिळतो. पतसेच, एअरटेलच्या 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त 600 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. यात Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music यांचा 3 महिन्यांसाठी समावेश आहे. मात्र लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये 5G नेटवर्कचे ऑप्शन नाही.

Airtel-Rs-395-Plan

तुम्हाला डेटाची चिंता न करता जर अधिक काळ वैधता हवी असेल, तर तुम्ही Airtel च्या प्लॅनसह रिचार्ज करू शकता. मात्र, तुम्हाला जास्त डेटाची आवश्यकता आहे, तर Jio चा प्लॅन अमर्यादित 5G डेटा ऑफर करतो. युजर्सने त्यांच्या गरजेनुसार बेनिफिट्सबघून प्लॅन्सची निवड करावी.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo