Reliance Jio: रोजचा डेटा संपल्यावर वापरायचे असेल इंटरनेट तर करा Rs 101 चा रिचार्ज

Reliance Jio: रोजचा डेटा संपल्यावर वापरायचे असेल इंटरनेट तर करा Rs 101 चा रिचार्ज
HIGHLIGHTS

Reliance Jio चा Rs 101 रिचार्ज केल्यावर 6GB डेटा मिळतो जो रोजची डेटा लिमिट पूर्ण झाल्यावर वापरू शकता आणि चांगला इंटरनेट स्पीड मिळवू शकता.

महत्वाचे मुद्दे

  • या प्रीपेड प्लान मध्ये मिळतो 6GB डेटा
  • चालू प्लानच्या वैधतेपर्यंत असेल वैध
  • Reliance Jio यूजर्स डेली डेटा लिमिट नंतर पण वापरू शकतात इंटरनेट

Reliance Jio ने जेव्हापासून Telecom सेक्टर मध्ये पाऊल टाकले आहे, सर्व कंपन्यांमध्ये वेगळीच हालचाल सुरु सुरु झाली आहे. प्रत्येक कंपनी आपले सब्सक्राइबर्स टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन सब्सक्राइबर्सना आकर्षक करण्यासाठी नवीन प्लान्स सादर करत असते तर कधी कधी नव्या ऑफर्स आणत आहे, ज्याचा थेट फायदा यूजर्सना होतो. रिलायंस जियो आल्यामुळे जियो यूजर्स सोबत इतर कंपनीच्या ग्राहकांना पण खूप फायदा झाला आहे.

Airtel, Vodafone, Idea असो वा बीएसएनएल सर्व सर्व कंपन्या एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहेत पण अजूनही जियो आपल्या जागी कायम आहे.

जियोच्या अनेक प्लान्स मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स सोबत प्रतिदिन डेटाचा फायदा मिळत आहे. जर तुम्ही जियो यूजर असाल तर तुम्हाला माहितीच असेल कि डेली डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होतो. त्यासाठी आज आम्ही जियोच्या अशा प्लान बद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमचा डेली डेटा संपला तरी काही फरक पडणार नाही.

Reliance Jio च्या या प्रीपेड प्लानची किंमत 101 रूपये आहे ज्यात रोज मिळणार डेटा संपल्यावर 6GB डेटाचा वापर केला जाऊ शकतो. या डेटाची वैधता चालू प्लान पर्यंत असेल. जर तुम्ही तुमच्या जियो प्लानची डेली लिमिट संपल्यावर मिळणाऱ्या मंद वेगाने त्रस्त असाल तर तुम्ही हा 101 रुपयांचा रिचार्ज करू शकता.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo