CLSA ने सांगितले आहे की, रिलायन्स जिओ पुढील 3 महिन्यांत देशातील सर्वात मोठी 4G सेवा लाँच करु शकते. ही देशातील सर्वात स्वस्त आणि हाय – स्पीड असलेली सेवा असणाराय.
CLSA ने असेही सांगितले आहे की, रिलायन्स बाबत येणा-या बातम्यांवरुन असे दिसतेय की, येणा-या 3 महिन्यात ही सेवा लाँच केली जाईल. ह्या देशात येणा-या सणांचे औचित्य साधून ही सेवा लाँच केली जाईल. म्हणजेच ऑक्टोबरच्या जवळपास ही सेवा लाँच केली जाईल.
हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग
जिओ हा दुसरा सर्वात मोठा डाटा ट्रॅफिक टेलिकॉम ऑपरेटर आहे आणि सांगितले जात आहे की, ही सेवा लाँच केल्याने रिलायन्स जिओ पहिल्या स्थानावर येऊ शकतो.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
एअरटेलने आपल्या यूजर्ससाठी कमी किंमतीत ६७ टक्क्यांपेक्षा जास्त डाटा देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर एअरटेलने आपल्या प्रीपेड मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट केली आहे.
येथे आहेत एअरटेलचे नवीन ऑफर्स:
तसेच आयडिया सेल्युलरने आपल्या 4G, 3G बिग इंटरनेट पॅक्सच्या संख्येत 67 टक्क्यांपर्यंत घट करण्याची घोषणा केली आहे. ह्यात आपल्याला त्या यूजर्ससाठी जे जवळपास2GB पासून 10GB पर्यंतचा डाटा वापरतात, त्यांना व्हॅल्यू फॉर मनी देण्याची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा – कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 लाँच, १.५ मीटर अंतरावरुन खाली पडली तरीही तुटणार नाही ही ग्लास
हेदेखील वाचा – एअरटेल, आयडिया, वोडाफोनने लागू केले GSMA मोबाईल कनेक्ट सोल्युशन