रिलायंस जियो चे हे प्लान्स प्रतिदिन देतात 2GB डेटा

Updated on 07-Dec-2018
HIGHLIGHTS

रिलायंस जियो चे हे चार प्लान्स प्रतिदिन 2GB डेटा ऑफर करतात.

रिलायंस जियो ने जवळपास 11 महिने झाले आपले टॅरिफ प्लान्स रिवाइज केले नाहीत. इतर टेलिकॉम कंपन्या जसे कि BSNL, भारती एयरटेल आणि वोडाफोन आईडिया ने अनेक प्लान्स सादर केले आहेत पण कधी जियोला मात देऊ शकल्या नाहीत. जर एयरटेलचा Rs 558 आणि वोडाफोनचा Rs 569 वाला प्लान पाहिले तर हे डेटा बेनिफिट आणि वैधतेच्याबाबतीती जियोला टक्कर देऊ शकतात पण 500 रुपयांच्या आत येणाऱ्या श्रेणीत जियोला या कंपन्या मागे टाकू शकलेल्या नाहीत.

जियोचे एकूण चार प्लान्स असे आहेत जे प्रतिदिन 2GB डेटा देतात आणि त्यांच्या किंमती Rs 199, Rs 398, Rs 448 आणि Rs 498 आहेत. जियोच्या Rs 498 च्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे झाले तर यूजर्सना या प्लान मध्ये 91 दिवसांसाठी 182GB 4G डेटा मिळतो.

किंमत आणि डेटा बेनेफिट पाहता 2GB पॅक्सची मागणी सरावात जास्त आहे. आज आम्ही जियोच्या याच प्लान्स बद्दल बोलणार आहोत जे 2GB डेटा ऑफर करतात.

रिलायंस जियोचा 198 रुपयांचा प्रीपेड प्लान

हा रिलायंस जियोचा खूप किफायतीशीर प्लान आहे जो प्रतिदिन 2GB 4G डेटा ऑफर करतो. या प्लान मध्ये यूजर्सना 28 दिवसांसाठी 2GB 4G डेटा मिळतो जो एकूण वैधतेसाठी 56GB होतो. रोजची 2GB ची लिमिट संपल्यावर इन्टरनेट स्पीड 64kbps होतो. याव्यतिरिक्त प्लान मध्ये अनलिमिटेड नॅशनल आणि रोमिंग कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि रिलायंस जियोच्या ऍप्सचा एक्सेस पण मिळतो.

रिलायंस जियोचा 398 रुपयांचा प्रीपेड प्लान

हा या लिस्ट मध्ये दुसरा प्लान आहे जो प्रतिदिन 2GB 4G डेटा ऑफर करतो. फक्त किंमत वाढल्यामुळे हा प्लान जास्त बेनेफिट्स पण ऑफर करतो. या प्लान मध्ये यूजर्सना 70 दिवसांच्या वैधतेसाठी 140GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त या प्लान मध्ये पण यूजर्सना अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि आणि रिलायंस जियोच्या ऍप्सचा एक्सेस पण मिळतो.

रिलायंस जियोचा 448 रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायंस जियोच्या Rs 448 प्रीपेड प्लान मध्ये प्रतिदिन 2GB 4G डेटा मिळतो, याची वैधता 84 दिवस आहे. एकूण वैधतेसाठी या प्लान मध्ये 168GB डेटा मिळत आहे. यूजर्सना या प्लान मध्ये फ्री अनलिमिटेड नॅशनल आणि रोमिंग कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि रिलायंस जियोच्या ऍप्सचा एक्सेस पण मिळतो.

रिलायंस जियोचा 498रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायंस जियोच्या सर्वात महाग प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा Rs 498 मध्ये येतो आणि  91 दिवसांसाठी 182GB डेटा ऑफर करतो. या प्लान मध्ये रोजची 2GB डेटा लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 64kbps होतो. यूजर्सना या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि रिलायंस जियोच्या ऍप्सचा एक्सेस पण मिळतो.
 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :