सध्या रिलायन्स JIO रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कंपनी आता प्रीपेड ग्राहकांना त्यांचे एंट्री लेव्हल टॅरिफ वाढवण्यासाठी आणि पोस्टपेड सेवेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करत आहे. यासह, रिलायन्स जिओने आपल्या एंट्री-लेव्हल पोस्टपेड टॅरिफ प्लॅनमध्ये 50 % वाढ केली आहे.
हे सुद्धा वाचा : येत्या उन्हाळ्यासाठी नवीन AC हवंय ? खरेदी करण्यापूर्वी 'हे' टिप्स नक्की वाचा…
रिलायन्स JIO आपला 199 रुपयांचा एंट्री-लेव्हल पोस्टपेड टॅरिफ प्लॅन बंद करणार आहे. ते 299 रुपयांच्या स्टँडअलोन प्लॅनमध्ये बदलले जाईल. त्याचप्रमाणे, अलीकडेच AIRTEL ने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एंट्री-लेव्हल प्लॅनमध्ये तब्बल 57 % वाढ केली होती. मात्र, ही वाढ करूनही जिओचे फॅमिली प्लॅन युजर्ससाठी फायदेशीर ठरणार, असा दावा केला जात आहे.
जिओच्या वैयक्तिक पोस्टपेड प्लॅनमध्ये 299 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित SMS सेवा आहे. याशिवाय 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि SMS या तिन्ही सुविधा अमर्यादित आहेत.
जिओच्या नुकत्याच लाँच झालेल्या नवीन पोस्टपेड प्लॅन्समध्ये 399 आणि 699 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. या प्लॅन्सद्वारे कंपनी आपला ARPU म्हणजेच सरासरी महसूल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबत, कंपनी 3 ऍड-ऑन सिम कार्ड प्लॅन देखील ऑफर करते, ज्यासाठी प्रत्येक वापरकर्त्याला अतिरिक्त 99 रुपये द्यावे लागतील. या नवीन सेवेसह एक महिन्याकरता फ्री ट्रायलदेखील उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, दोन्ही रिचार्ज प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये 75GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल. तर, 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Netflix आणि Amazon Primeची मेम्बरशिप देखील मिळेल.