ह्या लीकमध्ये अशी माहिती दिली आहे की, कोणत्याही डिवाइसशिवाय आपण रिलायन्स जिओचा 4G सिम घेऊ शकता. रिलायन्स जिओ डिवाइससह डाटा ऑफरसुद्धा उपलब्ध होईल.
रिलायन्स लवकरच बाजारात आपली 4G सेवा लाँच करणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स 4G डाटा प्लानविषयी काही लीक्स समोर आले होते. आता ह्या सेवेशी संबंधित एक लीक समोर आला आहे. आता एका व्हिडियोच्या माध्यमातून रिलायन्सच्या 4G डाटा प्लानविषयी माहिती मिळाली आहे.
ह्या व्हिडियोविषयी बोलायचे झाले तर ह्यात कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या बिटा संस्करणला दाखवले गेले आहे. व्हिडियोनुसार, रिलायन्स जिओ डिवाइससह डाटा ऑफरसुद्धा उपलब्ध होतील.
ह्या लीकमध्ये अशी माहिती दिली गेली आहे, आपण कोणत्याही डिवाइसशिवाय आपण रिलायन्स जियोचा 4G सिम घेऊ शकता.ह्या लीकमध्ये कंपनीच्या सेवांविषयीसुद्धा चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कंपनी म्यूजिक सेवेसह ऑनलाइन मूव्ही डिमांड आणि न्यूज अॅप सारख्या सेवासुद्धा सादर करणार आहे. त्याचबरोबर क्लाउड स्टोरेज आणि मोबाईल पेमेंट सेवासुद्धा उपलब्ध होऊ शकते.
ह्या व्हिडियोनुसार, रिलायन्स जिओच्या वेबसाइटवरुन 4G इनेबल हँडसेटशिवाय सिमसुद्धा घेतले जाऊ शकते. सिममध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड पर्यायसुद्धा आहेत. हँडसेटसह 75GB डाटा ९० दिवसांसाठी मोफत दिला जाईल.