रिलायंस जियो यूजर्स साठी हि खास बातमी असू शकते कि कंपनी ने जियो सेलिब्रेशन पॅकची वैधता वाढवली आहे. यानुसार आता यूजर्सना 10GB चा डेटा वेगळा दिला जात आहे.
Reliance Jio ने काही यूजर्ससाठी जियो सेलिब्रेशन पॅक ची मुदत वाढवली आहे ज्यानुसार आता कंपनी आपल्या खास ग्राहकांना 5 दिवसांसाठी रोज 2GB एडिशनल डेटा देत आहे. तसेच रिलायंस कंपनी कडून या 5 दिवसांत या यूजर्सना 10GB डेटा दिला जात आहे. विशेष म्हणजे जियो सेलिब्रेशन पॅक 2018 मध्ये सप्टेंबर मध्ये लॉन्च करण्यात आला होता. यूजर्सना जर जाणून घ्यायचं असेल कि हि एडिशनल डेटा ची सुविधा त्यांना कंपनी कडून मिळत आहे कि नाही किंवा मग ते कंपनीची हि खास ऑफर मिळवणाऱ्या यूजर्स पैकी एक आहेत कि नाही, हे ते MyJio ऍप मध्ये जाऊन चेक करू शकता.
ऑफर साठी सिलेक्टेड यूजर्सना रोज दिला जाणारा चालू प्लान सोबतच 2GB चा एडिशनल डेटा वाउचर क्रेडिट केला जाऊ शकतो. MyJio ऍप मधील My Plan सेक्शन मध्ये जाऊन यूजर्स चेक करू शकतात कि त्यांच्या चालू प्लानच्या खालीच Jio Celebrations Pack दिसत आहे कि नाही. तिथे यूजर्सना सेलिब्रेशन पॅकची वैधते सोबत त्यांचा डेटा प्लान कधी रिन्यू होईल ते पण दिसेल.
विशेष म्हणजे कंपनी ने Jio Celebrations Pack आपल्या दुसऱ्या एनिवर्सरी वर मॅक्सिमम 10GB डेटा सह लॉन्च केला होता. या डेटा ऑफरच्या आधी पण फेस्टिव सीजन अंतर्गत दिवाळीत रिलायंस जियो Jio Diwali Dhamaka ऑफर घेऊन आली होती ज्यात 149 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज वर 100% कॅशबॅक दिला जात होता.