Jio चे हे चार प्लान्स देतात रोज 2GB डेटा
जियोचे हे चारही प्लान्स वेगवेगळ्या वैधते सह येतात पण या सर्व प्लान्स मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डेटा मिळतो.
Reliance Jio ला टक्कर देण्यासाठी भारतीय टेलिकॉम बाजारात दुसरे सर्विस प्रोव्हायडर्स भरपूर प्रयत्न करत असतात. जेव्हा पासून जियो टेलिकॉम बाजारात आली आहे सर्व कंपन्या हादरल्या आहेत मग ती एयरटेल असो, वोडाफोन आईडिया असो किंवा मग बीएसएनएल. Jio ला आव्हान देण्यासाठी नेहमीच कंपन्या नवीन प्लान्स ऑफर करत असतात पण जियो ने ठाम पाय रोवले आहेत आणि प्रत्येक यूजरच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लान्स ऑफर करत आहे.
आपण आज जियोच्या त्या प्लान्स बद्दल बोलणार आहोत जे प्रतिदिन 2GB डेटा ऑफर करतात पण या सर्व प्लान्सची वैधता वेगवेगळी आहे.
जियोचे हे चार प्लान देतात प्रतिदिन 2GB डेटा
Rs 198
रिलायंस जियोच्या Rs 198 च्या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डेटा मिळतो ज्याची वैधता 28 दिवस आहे आणि या हिशोबाने या प्लान मध्ये यूजर्सना एकूण 56GB डेटा मिळतो. डेटा बेनिफिट व्यतिरिक्त रिलायंस जियोच्या या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे.
Rs 398
रिलायंस जियोच्या या प्लान मध्ये पण प्रतिदिन 2GB डेटा मिळतो आणि सोबत यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि जियो ऍप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन पण मिळते. या प्लानची एकूण वैधता 70 दिवस आहे आणि प्लानच्या एकूण वैधतेत यूजर्सना 140GB डेटा मिळत आहे.
Rs 448
जियोच्या Rs 448 च्या रिचार्ज प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डेटा मिळतो जो एकूण अवधीसाठी 168GB होतो आणि या प्लानची वैधता 84 दिवस आहे. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि जियो ऍप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन पण मिळते.
Rs 498
या प्लान मध्ये जियो 91 दिवसांच्या वैधतेसाठी एकूण 182GB डेटा ऑफर करत आहे आणि प्रतिदिन यूजर्सना 2GB डेटा मिळणार आहे. डेटा व्यतिरिक्त प्लान मध्ये अनलिमिटेड कॉल्स, प्रतिदिन 100SMS आणि कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शनचा समवेश आहे.