Jio Plans Offer: लोकप्रिय प्लॅन्ससोबत YouTube Premium मिळतोय Free, जाणून घ्या किंमत
Jio ने AirFiber आणि Fiber वापरकर्त्यांसाठी एक मोफत YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शन सादर केले.
भारतात एका महिन्यासाठी YouTube Premium सबस्क्रिप्शनची किंमत 159 रुपये आहे.
ही ऑफर फक्त त्या वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे Jio च्या पोस्टपेड ब्रॉडबँड प्लॅनचे सदस्यत्व आहे.
रिलायन्स Jio ने AirFiber आणि Fiber वापरकर्त्यांसाठी एक मोफत YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शन आणले आहे. यामध्ये एक किंवा दोन महिन्यांसाठी नाही तर, युजर्सना तब्बल दोन वर्षांसाठी यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त त्या वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे Jio च्या पोस्टपेड ब्रॉडबँड प्लॅनचे सदस्यत्व आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, रिलायन्स Jio आणि YouTube यांच्यातील भागीदारीमधील हा भाग आहे. जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत आणि तपशील-
Jio Plans
ही ऑफर JioFiber/AirFiber च्या पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे, ज्यांनी 888 रुपये, 1199 रुपये, 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3499 रुपयांचा प्लॅन ऑफर केला आहे. YouTube Premium प्लॅन्ससह, वापरकर्त्यांना ऍड-फ्री पाहण्याचा अनुभव, ऑफलाइन पाहण्यासाठी व्हिडिओ डाउनलोड करण्याची क्षमता, बॅकग्राउंड प्ले आणि YouTube Music Premium चे ऍक्सेस मिळते.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, भारतात एका महिन्यासाठी YouTube Premium सबस्क्रिप्शनची किंमत 159 रुपये आहे. जर युजर्सने 12 महिन्यांचा प्लॅन घेतला तर त्याची किंमत 1,490 रुपये आहे. मात्र, JioFiber/AirFiber पोस्टपेड ब्रॉडबँड प्लॅन्ससह, तुम्ही ते दोन वर्षांसाठी मोफत मिळवू शकता. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
YouTube Premium मोफत मिळवण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम, तुम्हाला JioFiber किंवा AirFiber च्या पात्र पोस्टपेड ब्रॉडबँड प्लॅनची खरेदी किंवा सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या MyJio अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल. त्यानंतर ॲप किंवा वेबसाइटवरील YouTube Premium बॅनरवर टॅप करावे लागेल. त्यानंतर फक्त तुमच्या YouTube खात्यामध्ये साइन इन करा. यानंतर, तुम्ही दोन वर्षे कोणतेही पैसे खर्च न करता आरामात JioFiber/AirFiber सेवेसह YouTube Premium चा आनंद घेण्यास सक्षम असाल.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जर तुम्ही Jio चे पोस्टपेड ब्रॉडबँड ग्राहक असाल तर तुम्ही कंपनीला तुम्हाला मोफत Jio सेट-टॉप बॉक्स STB साठी रिक्वेस्ट देखील करू शकता. त्याचा वापर करून तुम्ही तुमचा जुना टीव्ही स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. यावर तुम्ही OTT कंटेंट देखील पाहू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile