रिलायंस जियो ने IPL 2018 सिझन जवळ असताना आपला एक नवीन मेगा प्लान सादर केला आहे, यात तुम्हाला 102GB डेटा मिळत आहे, तसेच या प्लान ची किंमत फक्त Rs 251 आहे.
रिलायंस जियो ने IPL 2018 सिझन जवळ असताना आपला एक नवीन मेगा प्लान सादर केला आहे, यात तुम्हाला 102GB डेटा मिळत आहे, तसेच या प्लान ची किंमत फक्त Rs 251 आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला सुनील ग्रोवर च्या कॉमेडी चा लाइव शो पण बघायला मिळेल. रिलायंस जियो नेहमीच आपल्या नवीन डाटा प्लांस लॉन्च करून यूजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम करत आहे. आपण असे ही म्हणू शकतो की त्यांचे प्लान असतातच असे की लोक खरच त्यांच्याकडे आकर्षित होतात. यावेळी पण कंपनी ने आपला एक नवीन प्लान सादर केला आहे, ज्यात 102GB डेटा मिळत आहे आणि याची किंमत Rs 251 आहे. तसेच या टेलीकॉम कंपनी ने कॉमेडियन सुनील ग्रोवर ला आपल्या मायजियो अॅप वर लाइव शो साठी होस्ट म्हणून घेतले आहे. कंपनी ने आपला नवीन क्रिकेट सीजन पॅक पण लॉन्च केला आहे, या पॅक मध्ये क्रिकेट रसिकांना सर्वात शानदार सुविधा मिळत आहेत, या पॅक मध्ये यूजर्स प्रत्येक लाइव क्रिकेट मॅच आपल्या मोबाइलवर बघू शकतात. त्यामुळे तुम्ही 51 दिवसांपर्यंत चालणार्या या मोठ्या सोहळ्याचा लाभ घेऊ शकाल. तसेच सुनील ग्रोवर जियो धन धना धन लाइव शो ला होस्ट करणार आहे. यात तुम्हाला शिल्पा शिंदे, अली असगर, सुगंधा मिश्रा सह कपिल देव आणि वीरेंद्र सहवाग पण दिसतील. हा शो तुम्ही फक्त माय जियो अॅप वर बघू शकाल. विशेष म्हणजे हा जियो आणि नॉन जियो दोन्ही यूजर्स साठी फ्री असेल.