भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Jio कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा पण दीघर्कालीन वैधतेसह लाँच करणात आला आहे. विशेष म्हणजे वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G चा ऍक्सेस देखील मिळणार आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये दररोज डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि SMS देखील समाविष्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Jio च्या नव्या प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
वर सांगितल्याप्रमाणे, Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. Jio च्या या नवा प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 98 दिवसांपर्यंत दीर्घकालीन वैधता मिळणार आहे. Jio ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह योजना आणल्या आहेत. जर तुम्ही Jio चे ग्राहक असाल आणि तुमच्यासाठी नवीन प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन फक्त तुमच्यासाठी आहे. हा प्लॅन तुम्हाला एकाच वेळी अनेक फायदे देत आहे.
डेटा वापरासाठी, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. 98 दिवसांच्या वैधतेनुसार, तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 196GB डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच, तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्ही लोकल आणि STD कॉलची सुविधा मिळेल. याशिवाय, तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ देखील मिळेल. तसेच, यात Jio Cloud, Jio Cinema आणि JioTV सूट ॲप्सचे ऍक्सेस देखील मिळेल.
त्याबरोबरच, यात युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. Jio चा हा नवीन प्लॅन ग्राहकांना OTT बेनिफिट्स देखील देतो. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Video वर मोफत ऍक्सेस देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हे सबस्क्रिप्शन पूर्ण 84 दिवसांसाठी मोफत मिळेल. लक्षात घ्या की, जिओ कंपनीचा हा पहिला प्लॅन आहे ज्याची वैधता 98 दिवस आहे. प्लॅन खरेदी करण्यासाठी क्लिक करा.