Jio वापरकर्त्यांची मजा! नवा प्लॅन लाँच, एकाच प्लॅनमध्ये तब्बल 13 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन Free
Jio कंपनीने आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन सादर केला.
Jio हा नवीन प्लॅन एंटरटेनमेंट विभागात सादर केला आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLIV, ZEE5, JioCinema Premium इ. सारख्या OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध
रिलायन्स Jio कंपनीने आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना एकाच रिचार्जमध्ये तब्बल 13 OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देतो. विशेष म्हणजे या प्लॅनची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दैनिक डेटा, कॉलिंग, SMS सारखे बेनिफिट्स मिळतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLIV, ZEE5, JioCinema Premium इ. सारख्या OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. जाणून घ्या प्लॅनची किंमती आणि सर्व बेनिफिट्स-
Jio चा 448 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स Jio कंपनीच्या या नवीन प्लॅनची किंमत 448 रुपये आहे. हा कंपनीचा नवा एंटरटेनमेंट प्लॅन आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुमच्या मनोरंजनाची भारी सोय करण्यात आली आहे. तुम्हाला एकाच वेळी 13 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जर तुम्हाला binge वॉच करायला आवडत असेल, तर Jio चा हा नवीन प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
या प्लॅनमध्ये JioTV प्रीमियम बंडलचा लाभ देखील मिळतो. JioTV प्रीमियम बेनिफिट अंतर्गत, प्लॅनमध्ये तुम्हाला 13 OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते, ज्यामध्ये SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lanka, Planet Marathi, Hoichoi, Chaupal आणि FanCode इ. सुविधा उपलब्ध आहेत.
एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर महत्त्वाचे टेलिकॉम बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. Jio चा नवा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाची सुविधा मिळते. दररोज 2GB डेटा व्यतिरिक्त, हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित 5G सपोर्ट देखील देतो. तसेच तुम्ही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा देखील मिळणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile