Jio ने अधिकाधिक युजर्सना आपल्या नेटवर्कशी जोडण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवा प्लॅन समाविष्ट केला आहे. नव्या प्लॅनसह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Fancode चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये Jio च्या प्रीमियम ॲप्ससह डेटा आणि इतर महत्त्वाचं सुविधा देखील दिल्या जातील. Jio चा हा नवा प्लॅन इतर टेलिकॉम दिग्गज Airtel आणि Vodafone Idea यांच्याची जोरदार स्पर्धा करेल. Jio च्या नवीन प्लॅनची किंमत 3333 रुपये आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Jio च्या नव्या प्लॅनचे बेनिफिट्स-
टेलिकॉम दिग्गज Jio च्या नवीन प्लॅनची किंमत 3333 रुपये आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या प्लॅनसह दररोज 100SMS ची सुविधा देखील दिली जात आहे. एवढेच नाही तर, प्लॅनसोबत Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud इ. चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये Fancode चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे, ज्याची वैधता 1 वर्षासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ॲपमध्ये क्रिकेट, फुटबॉल आणि फॉर्म्युला 1 सारखे स्पोर्ट्स लाईव्ह पाहता येतील. फॅनकोड सदस्यत्व 200 रुपये प्रति महिना खरेदी केले जाऊ शकते. त्याच वेळी, त्याचे सबस्क्रिप्शन देखील 999 रुपये भरून वार्षिक घेतले जाऊ शकते.
या नव्या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. लक्षात घ्या की, हा पॅक अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.
Jio च्या 3,333 रुपयांच्या पॅक व्यतिरिक्त FanCode चे सबस्क्रिप्शन Jio AirFiber आणि Jio Fiber प्लॅनसह 1,199 आणि त्याहून अधिक किंमतीच्या प्लॅनसह ऑफर केले जाईल. याशिवाय, 398, 1,198 आणि 4,498 रुपयांच्या प्लॅनची निवड करणाऱ्या ग्राहकांना FanCode चे मोफत ऍक्सेस मिळेल.