Jio : रिलायन्स जिओने आणली जबरदस्त ऑफर, आता तर ग्राहकांची मज्जाच मजा !

Updated on 28-Mar-2023
HIGHLIGHTS

ब्रॉडबँड युजर्ससाठी नवीन JioFiber Backup Plan लाँच

नवीन बॅकअपची किंमत 198 रुपयांपासून सुरू

30 मार्च 2023 पासून Jio ची ही नवीन सर्व्हीस यूजर्ससाठी उपलब्ध होईल.

लवकरच IPL 2023 सुरू होणार आहे. अलीकडेच, IPL 2023 निमित्त जिओने क्रिकेट प्लॅन्स लाँच केले होते. तर, आता IPL सुरू होण्यापूर्वी टेलिकॉम कंपनीने ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी नवीन JioFiber Backup Plan लाँच केला. 30 मार्च 2023 पासून Jio ची ही नवीन सर्व्हीस यूजर्ससाठी उपलब्ध होईल. या नवीन बॅकअपची किंमत 198 रुपयांपासून सुरू होते. बघुयात सविस्तर- 

Jio चा 198 रुपयांचा बॅकअप प्लॅन

Reliance Jio च्या या नवीन सर्व्हीसची किंमत 198 रूपये सुरू होते. 198 रूपये दिल्यानंतर तुम्हाला 10 Mbps स्पीडसह अमर्यादित डेटा मिळेल. तसेच, तुमचं प्रायमरी ब्रॉडबँड कनेक्शन डाउन झाल्यास तुम्ही या सर्व्हीसचा लाभ घेऊ शकता. सोबतच तुम्हाला 1 दिवस, 2 दिवस किंवा 7 दिवसांसाठी 30Mbps किंवा 100Mbps पर्यंत स्पीड वाढवता येईल. ही सर्व्हिस एका महिन्याच्या वैधतेसह आहे.  

 याव्यतिरिक्त, युजर्सना कंपनी सेट टॉप बॉक्स अपग्रेड करण्याचाही ऑप्शन देत आहे. प्रती महिना 100 रूपये भरल्यानंतर, तुम्हाला मोफत STB सह 400 लाइव्ह टीव्ही चॅनेलसोबत 6 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळेल. तर, महिन्याला 200 रूपये भरल्यानंतर तुम्हाला मोफत सेट टॉप बॉक्ससह 550 लाइव्ह टीव्ही चॅनेलसोबत 14 OTT ॲप्सचा ॲक्सेस दिला जाईल.

JioFiber बॅकअप प्लॅन कसे घ्याल ?

जर तुम्हाला Jio चा हा नवीन बॅकअप प्लॅन घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 6000860008 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल किंवा तुम्ही Jio च्या साइटवर किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या Jio रिटेलरकडे जाऊन बॅकअप कनेक्शन घेऊ शकता.

लक्षात घ्या की, हा बॅकअप प्लॅन किमान पाच महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला 5 महिन्यांसाठी 1490 रुपये खर्च येईल. म्हणजेच पाच महिन्यांसाठी 990 रुपये आणि इंस्टॉलेशनसाठी 500 रुपये खर्च येईल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :