अनेक नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओ आपल्या MNP ग्राहकांना पहिल्या काही महिन्यांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि डाटा सर्विस देणार आहे.
रिलायन्स जिओ लवकरच आपली 4G LTE सेवा सुरु करणार आहे. मात्र ही सेवा सुरु होण्याआधीच अनेक अफवांना जणू उधाणच आलय. आता अशी नवीन माहिती मिळत आहे की, रिलायन्स जिओ आपले सदस्य वाढवण्यासाठी MNP(mobile number portability) सदस्यांना एक विशेष ऑफर देणार आहे. आपल्या नवीन सब्सक्रायबर्ससाठी कंपनीने आपली आधीची ऑफर जेथे पहिल्या तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, डाटा आणि एसएस मिळत होते, ती ऑफर वाढविण्याची शक्यता आहे.
तसेच रिलायन्स जिओ लवकरच आपल्या पोस्टपेड प्लान्समध्ये ५-१० पट जास्त डाटा, मोफत व्हॉइस कॉलिंग, व्हिडियो मिनिट्स देणार आहे. हा प्लान बाजारात असलेल्या इतर पोस्ट-पेड प्लानपेक्षा खूपच वेगळा आणि चांगला असेल.
तसेच रिलायन्स जिओच्या नेटवर्कशी कनेक्ट झाल्यास आपल्याला पहिल्या काही महिन्यांसाठी काही मोफत ऑफर्स आणि झिरो रेंटलसुद्धा मिळेल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.