रिलायंस जियो ने ICICI बँक सोबत भागेदारी केली आहे, कंपनीला आपल्या युजर्सना दोन महिने रिलायंस जियो पोस्टपेड मोफत देता यावी यासाठी ही भागेदारी करण्यात आली आहे. ही ऑफर सध्या त्या यूजर्स साठी उपलब्ध आहे, ज्यांच्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्सना 7th पोस्टपेड बिल रेंटल डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर यूजर्सना त्यांच्या जियो पोस्टपेड वर मिळणार आहे.
त्याचबरोबर कॅशबॅक पण यूजर्सना मिळेल, जो त्यांच्या पोस्टपेड बिल रेंटल एवढा असेल. पण त्याआधी त्यांना क्रेडिट कार्ड वापरून 12 पोस्टपेड बिल भरावे लागतील. याचा अर्थ असा की यूजर्सना ही ऑफर मिळणार आहे ज्यात त्यांना दोन महिन्यासाठी फ्री पोस्टपेड मिळणार आहे, पण त्यासाठी त्यांना वर्षभराची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर त्यांना ही ऑफर मिळेल. हा डिस्काउंट आणि फ्री ऑफर पण तुम्हाला आणि अन्य स्वरुपात मिळणार आहे.
पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ICICI बँक जियो पोस्टपेड ऑफर साठी स्वतःला एनरोल करावे लागेल. तसेच तुम्हाला या सेवेत ऑटो पे साठी साइन अप करने आवश्यक आहे. याचा अर्थ असा की यूजर्स च्या ICICI बँक क्रेडिट कार्ड मधून रिलायंस जियो आपोआप पैसे डीडक्ट करणार आहे. यासाठी यूजर्सना मायजियोअॅप मध्ये जावे लागेल, त्यानंतर जियोपे वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर हे फीचर एक्सेस करण्यासाठी यूजर्सना स्वाइप लेफ्ट करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंट डिटेल्स बद्दल विचारण्यात येईल.
तिथे यूजर्सना पहिला पर्याय निवडावा, म्हणजे तुम्हाला जियोऑटोपे ची निवड करावी लागेल. त्यानंतर क्रेडिट कार्ड चा पर्याय निवडावा लागेल. मग ही प्रक्रिया पूर्ण होईल, आता यूजर्सना Rs 199 प्रतिमाह या दराने पैसे द्यावे लागतील. म्हणजे मग त्यांना हा मोठा डिस्काउंट मिळेल.