रिलायंस जियो ने सादर केली आहे नवीन ‘जियो फुटबॉल ऑफर’, मिळत आहेत हे फायदे

Updated on 19-Feb-2018
HIGHLIGHTS

जियो आपल्या या ऑफर अंतर्गत काही निवडक स्मार्टफोन्स विकत घेतल्यास जुन्या आणि यूजर्सना Rs 2,200 चा कॅशबॅक देत आहे.

रिलायंस जियो ने आपल्या नवीन आणि जुन्या यूजर्स साठी 'जियो फुटबॉल ऑफर' सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत जियो आपल्या ग्राहकांना Rs. 2200 चा कॅशबॅक देत आहे. ही ऑफर मिळवण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2018 आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी यूजरला खाली दिलेल्या लिस्ट मधील कोणत्याही फोन मध्ये जियो सिम टाकल्या नंतर Rs 198 किंवा Rs 299 किंमतीचा कोणताही एक रिचार्ज 31 मार्च 2018 च्या आधी करावा लागेल. 

रिचार्ज यशस्वी झाल्यावर यूजर च्या माईजियो अकाउंट मध्ये लगेचच 44 वाउचर्स येतील, प्रत्येक वाउचर्स Rs. 50 किंमतीचा असेल. या वाउचर्स चा वापर Rs 198 किंवा Rs 299 किंमतीचा रिचार्ज करताना एक-एक करून केला जाऊ शकतो. एक रिचार्ज वर एकच वाउचर चा वापर केला शकतो. 

विशेष म्हणजे, या वाउचर्स चा वापर 31 मे 2022 च्या आधीच करावा लागणार आहे. ही ऑफर या सर्व डिवाइसेस वर उपलब्ध आहे. या डिवाइसेसना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म्स वरून तुम्ही विकत घेऊ शकता. खाली त्या डिवाइसेस ची लिस्ट दिली आहे ज्यावर ही ऑफर उपलब्ध आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :