रिलायंस जियो ब्रॉडबँड यूजर्सना मिळू शकतात 100GB अगदी मोफत, इतकेच नव्हे तर प्रत्येक महिन्याला मिळेल. पण यात एक कॅच आहे. चला बघुया हा ट्विस्ट काय आहे तो.
रिलायंस जियो ची ब्रॉडबँड सेवा सर्व यूजर्स पर्यंत त्यांना एक नवीन अनुभव देण्यासाठी पोहोचायला आता काहीच दिवस उरले आहेत. कंपनीला आधी पासून रिलायंस जियो गीगाफाइबर बद्दल खुप चांगला रेस्पोंस मिळत आहे. कंपनी कडून अजूनतरी प्लान्स बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही, पण या सेवेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याआधी माहिती मिळाली होती, ज्यानुसार प्लान्स ची किंमत जवळपास Rs 500 पासून सुरू होईल, जे तुम्हाला चारपट फायदे देतील.
तसेच पहिल्या तीन महिन्यांसाठी कंपनी चे प्लान वेगळे असू शकतात. पण सेवा पूर्णपणे मोफत मिळणार नाही. तुम्हाला या सेवेसाठी जवळपास Rs 4500 कंपनीला इनस्टॉलिंग च्या वेळी द्यावे लागतील. असे बोलले जात आहे की जियो कडून ही रक्कम ONT डिवाइस साठी घेतली जात आहे. जी सेवा बंद करताना तुम्हाला परत दिली जाईल. त्याचबरोबर जियो कडून तुम्हाला जवळपास 100GB डेटा प्रति माह फ्री दिला जाणार आहे.
याचा अर्थ असा की ही सेवा तुमच्यासाठी फ्री नसेल पण कंपनी ची जशी पद्धत आहे त्यानुसार कंपनीने तुम्हाला मागील अनेक ऑफर्स द्वारा एक जबरदस्त अनुभव दिला आहे. त्यामुळे यावेळी पण असेच काहीसे होऊ शकते. पण ही सेवा कधी सुरू होते याची वाट बघावी लागेल.