रिलायन्स अलीकडेच असे सांगितले की, त्यांची 4G सेवा जवळपास ५ लाख लोक ट्रायल पीरिएडमध्ये वापरत आहेत.
रिलायन्स जिओने आपल्या 4G सेवेला सर्वसामान्यांसाठी एक ट्रायल स्वरुपात सुरु केले आहे. मात्र ही सेवा ते तेव्हाच वापरु शकतात, जेव्हा कोणी रिलायन्सचा एम्प्लोयी त्याला सिम घेतल्यानंतर त्यांना निमंत्रण पाठवेल. त्याशिवाय ह्या सेवेला आताही सर्वच लोक वापरु शकत नाही.
त्याशिवाय जर तुम्हाला ही सेवा वापरायची असेल, तर आपल्याला LYF डिवाइस खरेदी करावा लागेल, तो सुद्धा रिलायन्सच्या डिजिटल स्टोरच्या माध्यमातून. त्यानंतरच तुम्ही ही सेवा वापरु शकता. LYF च्या डिवाइस बाजारात ५,५९९ रुपयांपासून १९,४९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
रिलायन्सच्या एका कर्मचा-यांचे म्हणणे आहे की, “जसे की आपल्या सर्वांना माहित असेल, की ही सेवा लाँच होण्यास आता काहीच अवधी राहिला आहे. आम्ही आमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला ही सेवा लाँच होण्याआधी वापरण्याची आकर्षक ऑफर देणार आहोत.”
ह्या स्कीमच्या अंतर्गत रिलायन्स कोणताही कर्मचारी १० लोकांना रिलायन्स सिम आणि LYF हँडसेट खरेदी करण्यासाठी निमंत्रण पाठवू शकतो. आणि हे कनेक्शन आपल्याला 90 दिवसांत रिलायन्सची 4G सेवेचा आनंद घेण्याची संधी देईल आणि ते सुद्धा त्याच्या लाँच आधीच… त्याचबरोबर ज्याला निमंत्रण पाठवले गेले आहे, त्याला ह्या सेवेला सक्रिय करण्यासाठी २०० रुपये द्यावे लागतील.
त्यानंतर आपल्याला ९० दिवसांसाठी जिओच्या 4G सेवेअंतर्गत येणा-या जिओ प्ले, जिओ ऑन-डिमांड, जिओ मॅग, जिओ बीट्स आणि जिओ ड्रायवरचा सुद्धा आनंद घेता येईल.