रिलायंस जियो ने जेव्हा पासून भारतीय टेलीकॉम बाजारात पाऊल टाकेल आहे तेव्हापासून रिचार्ज प्लान अफोर्डेबल झाले आहेत. रिलायंस जियो आल्यांनतर जवळपास सर्व इतर टेलीकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान्स खूप स्वस्त केले आहेत. जियो ने आपल्याला भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोजच्या SMS चे जणू वरदान दिले होते आणि त्यानंतर जवळपास सर्वच कंपन्या त्या दिशेने वाटचाल करू लागल्या. जसे जसे जियोचे प्लान वाढत गेले तसा तसा फायदा आपल्याला म्हणजे सब्सक्राइबर्सना जास्त फायदा झाला आहे.
सध्या कंपनी आपले कॉम्बो प्लान्स विकत आहे. यात तुम्हाला 1.5GB डेटा पासून 5GB डेटा रोज ऑफर केला जात आहे. ताईच तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंग पण मिळत आहे, सोबतच इतर अनेक लाभ पण तुम्हाला मिळत आहेत. जियोच्या Rs 448 मध्ये येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 168GB डेटा मिळत आहे, जो इतर कोणतीही टेलीकॉम कंपनी तुम्हाला अजूनतरी देऊ शकली नाही. आईडिया ने पण असाच एक प्लान लॉन्च केला आहे, ज्यात तुम्हाला जवळपास इतकाच डेटा मिळत आहे.
विशेष म्हणजे सध्या 2GB वाले डेटा पॅक्स सर्वात जास्त विकले जात आहेत, लोकांना हे जास्त आवडत आहेत. चला जाणून की 2GB डेटा वाले किती प्लान आहेत आणि यांत तुम्हाला कोणत्या सुविधा मिळत आहे.
या श्रेणी मध्ये रिलायंस जियो कडून वेगवेगळ्या वैधतेसह जवळपास 4 प्लान्स बाजारात आहेत. या श्रेणी मध्ये सर्वात पहिला प्लान Rs 198 मध्ये येणार आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेली डेटा मिळत आहे. त्यांनतर येतो तो रिलायंस जियोचा पुढील प्लान Rs 398 मध्ये येतो, या प्लान मध्ये तुम्हाला 70 दिवसांसाठी 2GB डेली डेटा मिळत आहे, म्हणजे तुम्हाला या रिचार्ज प्लान मध्ये 140GB डेटा मिळणार आहे.
तिसऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर रिलायंस जियो कडे अजून एक प्लान पण आहे, जो Rs 448 मध्ये येतो. या प्लान मध्ये तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसाठी 2GB डेली डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये तुम्हाला 168GB डेटा मिळत आहे. आईडिया कडे पण आता असाच एक प्लान आहे. अजून एका म्हणजे चौथा प्लॅन पण आहे जो तुम्हाला Rs 498 मध्ये मिळतो आणि यात तुम्हाला 2GB डेली डेटा पण मिळतो. या प्लानची वैधता 91 दिवस आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या प्लान मध्ये एकूण 182GB डेटा मिळत आहे.