रिलायंस जियो ने पुन्हा केला धमाका: मिळणार नाहीत यापेक्षा चांगले प्लान
रिलायंस जियो चा Rs 448 मध्ये येणारा प्रीपेड रिचार्ज प्लान 168GB 4G डेटा व्यतिरिक्त देत आहे अजून खूप काही, इथे जाणून घ्या या प्लान बद्दल सर्व काही...
जेव्हापासून रिलायंस जियो ने भारतीय टेलीकॉम बाजारात आली आहे, तेव्हापासून रिचार्ज प्लान अफोर्डेबल झाले आहेत. रिलायंस जियो आल्यामुळे जवळपास इतर सर्वच टेलीकॉम कंपन्यांनी आपल्य रिचार्ज प्लान्सच्या किंमती कमी केल्या आहेत. जियो ने आपल्याला भरभरून डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोजचे SMS चा जणू काही वरदान दिला होता आणि त्यानंतर जवळपास सर्वच कंपन्या असे करू लागल्या आहेत. जसे जसे जियोचे प्लान वाढले तसा तसा आपल्याला म्हणजे सब्सक्राइबर्सना सर्वात जास्त फायदा झाला आहे.
सध्या कंपनी आपले कॉम्बो प्लान्स विकत आहे. त्यात तुम्हाला 1.5GB डेटा पासून 5GB डेटा रोज मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्री अनलिमिटेड कॉलिंग पण मिळत आहे. जर जियो च्या Rs 448 मध्ये येणार्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 168GB डेटा मिळत आहे, जो इतर कोणतीही कंपनी आता पर्यंत देऊ शकली नाही. कदाचित आईडिया ने पण असाच एक प्लान लॉन्च केला आहे, ज्यात तुम्हाला जवळपास इतकाच डेटा मिळत आहे.
याव्यतिरिक्त बोलायचे झाले तर आजकाल 2GB असलेले. डेटा पॅक्स सर्वात जास्त विकले जात आहेत. हे लोकांना जास्त आवडत आहेत. चला तर बघुया कि 2GB डेटा असलेले प्लान किती आहेत आणि यांत तुम्हाला काय काय सुविधा मिळत आहेत.
या श्रेणी मध्ये रिलायंस जियो ने वेगवेगळ्या वैधते सह जवळपास 4 प्लान्स बाजारात आहेत. लक्षात घ्या सर्वात आधी प्लान Rs 198 मध्ये येतात. या प्लान मध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधते सह 2GB डेली डेटा मिळत आहे. त्यानंतर रिलायंस जियो चा पुढील प्लान Rs 398 मध्ये येतो. या प्लान मध्ये तुम्हाला 70 दिवसांच्या वैधते साठी 2GB डेली डेटा मिळत आहे, म्हणजे तुम्हाला या रिचार्ज प्लान मध्ये 140GB डेटा मिळणार आहे.
आता जर तिसर्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर रिलायंस जियो कडे अजुन एक प्लान पण आहे, जो Rs 448 मध्ये येतो. या प्लान मध्ये तुम्हाल 84 दिवसांसाठी एकूण 2GB डेली मिळतो. या प्लान मध्ये तुम्हाला एकूण 168GB डेटा मिळत आहे. आईडिया कडे पण आता एक असाच प्लान आहे. याव्यतिरिक्त अजून एका चौथ्या प्लान बद्दल चर्चा करायची झाल्यास हा तुम्हाला Rs 498 मध्ये मिळतो आणि यात तुम्हाला 2GB डेली डेटा पण मिळतो. या प्लानची वैधता 91 दिवस आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला या प्लान मध्ये एकूण 182GB डेटा मिळत आहे.