रिलायन्स Jio चे 5G नेटवर्क आता जवळपास सर्व देशात पसरले आहे. कंपनी नेहमीच आपल्या यूजर्सच्या सोयीसाठी अनेक प्रकारचे प्लॅन्स सादर करत असते. दरम्यान, Jio कंपनीने आता आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये आणखी 2 नवीन प्लॅन्सचा समावेश केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना टेलीकॉम बेनिफिट्ससोबत अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. यामध्ये अमर्यादित 5G डेटासह काही विशेष फायदे देखील उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात या प्लॅन्सच्या किमती आणि फायद्यांशी संबंधित सर्व तपशील-
वर सांगितल्याप्रमाणे, Jio च्या नवीन प्लॅन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio ने आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये 1028 रुपये आणि 1029 रुपयांचे दोन नवीन प्लॅन्स समाविष्ट केले आहेत. या दोन्ही कंपनीचे लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी प्लॅन्स आहेत. विशेष म्हणजे या प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित 5G डेटा एक्सेस देखील मिळणार आहे.
Jio चा नवा 1028 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. Jio च्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा ऑफर करणात आहे. लक्षात घ्या की, हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटाचा ऍक्सेस देखील देतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही आनंद घेता येईल. त्याबरोबरच, तुम्हाला दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळेल.
इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन बॅचलर्ससाठी अगदी अप्रतिम ठरणार आहे. कारण, या प्लॅनसह Swiggy वापरकर्त्यांसाठी Swiggy One Lite चे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळणार आहे. त्याबरोबरच, यासह तुम्हाला JioTV, JioCinema आणि JioCloud इ. चा ऍक्सेस देखील मिळेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
दुसरीकडे, 1029 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनचे फायदे 1028 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. म्हणजेच वापरकर्त्यांना या प्लॅनसह दररोज 2GB डेटा मिळेल. त्याबरोबरच, हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटाचा ऍक्सेस देईल. जेणेकरून तुम्ही विना अडथडा ऑनलाईन काम करण्यास सक्षम असाल. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळणार आहे. मात्र, प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Lite चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!