रिलायन्स Jio ने देखील आपल्या प्लॅन्सच्या किमतीत दरवाढ केली असली तरीही कंपनी अजूनही आपल्या नाविन्यपूर्ण प्लॅन्ससह टेलिकॉम मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे. होय, कंपनीकडे अनेक प्रकारचे रिचार्ज आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मनोरंजनासाठी OTT सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जातात. यामध्ये 175 रुपयांचा प्लॅन हा सर्वात परवडणारा पर्याय आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात 175 रुपयांच्या प्लॅनमधील सर्व बेनिफिट्स-
175 रुपयांचा Jio प्लॅन कंपनीने केवळ एक डेटा पॅक म्हणून सादर केला होता. हा प्लॅन संपूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. संपूर्ण वैधतेदरम्यान हा प्लॅन तुम्हाला 10GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन अशा युजर्ससाठी योग्य आहे, जे डेटा कॅप हिट न करता स्ट्रीमिंग, ब्राउझिंग आणि इतर ऑनलाइन ऍक्टिव्हिटीजसाठी डेटा वापरण्यास प्राधान्य देतात. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि SMS चे लाभ मिळत नाही.
विशेष म्हणजे हा प्लॅन तुमच्या मनोरंजनाची संपूर्ण काळजी घेतो. खरं तर, हा प्लॅन सदस्यांना 28-दिवसांच्या वैधतेसह JioCinema प्रीमियम सबस्क्रिप्शन ऑफर करतो, ज्याद्वारे वापरकर्ते विविध चित्रपट, टीव्ही शो आणि इतर आवडते कंटेंट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये JioTV मोबाइल ॲपद्वारे 12 इतर OTT ॲप्सचे ऍक्सेस देखील समाविष्ट आहे. या ॲपमध्ये Sony LIV, ZEE5, Liongate Play, Discovery+, Sun NXT इ. लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे ऍक्सेस मिळेल. यासह या प्लॅनमध्ये तुम्हाला अगदी कमी किमतीत सर्वसमावेशक एंटरटेनमेंट पॅकेज मिळणार आहे.
Jio च्या अनेक हाय-एंड एंटरटेन्मेंट म्हणजेच OTT प्लॅन्स उपलब्ध आहेत. केवळ OTT च नाही तर हे प्लॅन्स अमर्यादित 5G डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 दैनिक SMS सह येतात. मात्र, ज्या युजर्सना केवळ डेटा आणि OTT सेवांमध्ये प्रामुख्याने स्वारस्य आहे आणि कमी किमतीत अप्रतिम प्लॅन हवा आहे. त्या युजर्ससाठी 175 रुपयांचा प्लॅन सर्वात परवडणारा पर्याय आहे.