टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी रिलायन्स जियो आपली 4G सेवा २७ डिसेंबरपासून सुरु करु शकते. कंपनी २७ डिसेंबरला आपली 4G सेवा लाँच करेल. सध्यातरी कंपनीकडून ह्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
एका रिपोर्टनुसार, रिलायन्स 4G सेवेसह 4G वोएलटीई स्मार्टफोनही सादर करेल, ज्यात जलद असा इंटरनेट उपलब्ध होईल, ह्या स्मार्टफोनची किंमत ४००० ते २५,००० रुपयांपर्यंत असेल.
ह्याआधी जून 2015 मध्ये रिलायन्सकडून त्यांच्या 4G सेवेबद्दल माहिती दिली होती. कंपनीचे मालक मुकेश अंबानींनी आपल्या वार्षिक बैठकीत सांगितले होते की, “आता ही सेवा परीक्षणाच्या प्रक्रियेत आहे मात्र डिसेंबर २०१५ पासून ही देशाच्या २९ राज्यांत आपली सेवा देणे सुरु करेल.” ते पुढे असेही म्हणाले की, २०१६-१७ आमच्या 4G सेवेचे पहिले वर्ष असेल. त्यांनी असेही सांगितले की, कंपनीची मजबूत बांधणी आणि एलटीई सेवा लक्षात घेता, आम्ही डिसेंबरमध्ये ४ हजारांपेक्षा कमी किंमतीत येणारे 4G स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहे.
रिलायन्स जियो इन्फोकॉमजवळ देशभरात चाललेल्या उदार व्यवस्थेमध्ये 4G स्पेक्ट्रम सर्वात विशाल आहे. काही अहवालानुसार असे सांगता येईल की, रिलायन्स जिओने हे ३४,००० करोड देऊन आपल्या हाती घेतले आहे.